महिला दिनी महाड भाजपने काढली महिलांची भव्य मोटारसायकल रॅली

60

रॅली मध्ये महिला शक्ति चा विजय असो, जिजाऊमाता आणि सावित्रीबाईंचा जयजयकार करण्यात आला.

महिला दिनी महाड भाजपने काढली महिलांची भव्य मोटारसायकल रॅ

मीडिया वार्ता न्युज
९ मार्च, महाड:  महिला दिना निमित्त आज महाड भाजपा महिला मोर्चाच्या वतीने शहरातून महिलांची भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली, तसेच व्यंजन स्पर्धे चेही आयोजन करण्यात आले होते.

आज महाड मध्ये विविध संघटना च्या वतिने महिला दिन साजरा करण्यात आला. दरम्यान महाड भाजपा महिला मोर्चाच्या वतीने शहरातून महिलांची भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅली मध्ये महिला शक्ति चा विजय असो, जिजाऊ आणि सावित्रीचा जयजय कार करण्यात आला.

 

हे आपण वाचलंत का?

 

या वेळी भाजपा महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रश्मी वाझे, जिल्हा उपाध्यक्षा निलीमा भोसले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य डाॅ.मंजुशा कुद्रीमोती, शहर अध्यक्षा नमिता दोशी, प्राजक्ता दळवी, श्वेता ताडफळे, आदिती ताडफळे, श्रध्दा भोसले, कल्पना विचारे, आराधना इंगळे, विद्या बुटाला, मेघना राठोड, नंदिनी मोरे, मंजिरी जोशी, स‌ई शिंदे या सह असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या. दरम्यान सायंकाळी विरेश्वर मंदिर सभागृहात व्यंजन स्पर्धे चे आयोजन करण्यात आले होते