महिला दिनाच्या निमित्ताने:  विधवा भगिणींशी संवाद साधताना…!

सौ.संगीता संतोष ठलाल 

मु.कुरखेडा जि.गडचिरोली 

मो: ७८२१८१६४८५

आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सर्व माता, भगिणींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जागतिक महिला दिन संपूर्ण भारत देशभर तसेच सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. काही ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा केले जाते व समाजातील काही कर्तूवान नारीशक्तींचा सन्मान, जाहीर सत्कार सुद्धा केला जातो. सर्व जणी मनमोकळ्या पणाने गप्पा मारत असतात ह्या सर्व गोष्टी फारच छान आहेत पण, याच समाजात राहणाऱ्या विधवा भगिणीचे काय. .? पाहिजे त्या प्रमाणात त्यांना स्थान मिळत नाही हे कोणापासूनही लपलेले नाही हे, सर्व बघून मला अत्यंत दुःख व्हायचे गेल्या काही दिवसांच्या आधी माझ्या विधवा भगिणीसोबत संवाद साधण्याचे मला भाग्य लाभले ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे म्हणून आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आज माझ्या विधवा भगिणींवरती थोडक्यात का होईना दोन शब्द लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. 

       समाजात राहणाऱे अनेक लोक दु:खी आहेत या जगात कोणीही सुखी नाही पण सर्वात जास्त दु:खात बुडालेल्या माझ्या विधवा भगिणी आहेत त्यांच्या विषयी अभ्यास करून बघितली कारण, त्यांचे जीवन हे इतरांपेक्षा जरा वेगळ्या प्रकारचे आहेत ह्या विषयी माहीत असताना सुद्धा न समजल्या सारखे वागत असतात खरच अशा लोकांना काय म्हणावे. ..? म्हणुन त्यांचे अनेकदा दु:ख पाहून त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधण्यासाठी मी मनात ठरवली होती. आणि योगायोग म्हणावे लागेल तो दिवस सुद्धा आला. तो दिवस सुहासिनी महिलांचा आनंदाचा दिवस म्हणजेच हिंदू धर्मातील महिलांसाठी हरितालिका तृतीया चा शुभ दिवस होता या दिवशी सुहासिनी महिला दोन दिवस हा सण साजरा करतात आणि मी पण करते कारण मी, सुहासिन आहे पण, विधवा भगिणींसोबत संवाद साधावे हे का म्हणून माझ्या मनात बरं आले असावे…? कदाचित यालाही कारण असावे अर्थातच ! तसेच झाले बऱ्याच वर्षापासून मी बघत आलेली आहे की, हरितालिका तृतीया सणाच्या दिवशी समाजातील सुहासिनी महिला विधवा भगिणींना आपल्या घरी बोलावत नाही त्यांना पूजेत स्थान देत नाही अस्पगुण होते, असे बरेचदा ऐकायला मिळाले आहे. आणि असल्या प्रकारचे विचार मला अजिबात पटत नव्हते आणि आजही पटत नाही.

    असल्या प्रकारची वागणूक बघून मला अत्यंत वाईट वाटले त्यामुळे मी त्याच दिवशी म्हणजेच हरितालिका तृतीया च्या दिवशी व मकरसंक्रांतीच्या दिवशी माझ्या विधवा भगिणींना घरी बोलावून त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधण्यासाठी व इतर महिलांसारखे त्यांचाही सन्मान जगात व्हावा या दृष्टीने त्यांना घरी बोलावून हळदीकुंकू, गोडधोड खावू देऊन तसेच हरितालिकेचा पूजेचा मान देऊन त्यांचा सत्कार करण्याचा ठरवली, स्नेहबंधनाचे धागे त्यांच्याशी विणावे असे मला वाटले तेव्हा, त्या क्षणी माझ्यासोबत कोणतेही अस्पगुण झाले नाही. मग इतरांना कसे काय अस्पगुण होतात. ..? हा एक प्रश्न आहे. पण, काहीही असो माझ्या विधवा भगिणींना मी वाचण्याचा प्रयत्न करून बघितली त्यामुळे मला त्या कळल्या माझ्या ह्या छोट्याशा प्रयत्नाला यश आले कारण त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे मला भाग्य लाभले त्या आनंदाच्या क्षणी म्हणजेच मकरसंक्रांतीच्या निमित्ताने कुरखेडा येतील पोलिस उपनिरीक्षक शितल ताई माने होत्या व हरितालिका तृतीया निमित्त माजी नगरसेविका आशाताई तुलावी, नगरसेविका कुंदाताई होत्या त्याच बरोबर बरेच विधवा भगिणी होत्या त्या सर्व मान्यवर ताईंनी सुद्धा विधवा भगिणींशी संवाद साधताना आपले योग्य मत नोंदविले कारण विधवा भगिणी ही अस्पगुणी नाही तर हिंमतवान आहे,ती सर्व काही करू शकते कारण ती कशातच कमी नाही. त्यांचे बोलणे ऐकताच सर्वाच्या चेहऱ्यावर आनंद तर होतेच पण त्या गहिवरून सुद्धा गेल्या होत्या स्वत:त्या आपुलकीने व्यक्त झाल्या मला फार आनंद झाला कारण मी पहिल्यांदाच माझ्या विधवा भगिणींना मनमोकळे पणाने गप्पा मारताना व संवाद साधताना,आपल्या व्यथा, वेदना, चांगली, वाईट परिस्थिती,दु:खाच्या विषयी सांगताना मी जवळून बघितली आहे असेच त्यांचे जीवन हसते, खेळते रहाण्यासाठी समाजाने त्यांच्याविषयी आपुलकीच्या भावनेने विचार करायला पाहिजे. त्यांना इतरांप्रमाणे जगता यावे यासाठी प्रयत्न करावे पण, त्यांच्या वाटेत काटे पेरण्याचा विचार सुद्धा आपल्या मनात आणू नये. पुन्हा मला अभिमानाने सांगावेसे वाटते की, माझ्या विधवा भगिणींचे पुण्य पाऊले माझ्या दारात पडले व माझा घर अजून पवित्र झाला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here