माणगांव येथील युनायटेड इंग्लिश स्कूल मोर्बाचे विद्यार्थी व शिक्षक वर्गानी राबविले रस्ता सुरक्षा अभियान

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

माणगांव :-माणगांव तालुक्यातील मोर्बा विभागात असणाऱ्या युनायटेड इंग्लिश स्कूल च्या वतीने आज दि.८ मार्च रोजी राबविले अनोखा उपक्रम महामार्ग तसेच शहरात गावोगावी होणारे अपघात याला कारणीभूत न जावो यासाठी इयत्ता ४थी ते ८ वी च्या विद्यार्थी यांनी मोर्बा विभागात येणाऱ्या जाणाऱ्या ग्रामस्थांना तसेच वाहतूकदाराना मार्गदर्शन केले.

युनायटेड इंग्लिश स्कूल मोर्बा च्या विद्यार्थी व शिक्षक वर्गानी मोर्बा बाजारात, नाक्यावर, गावात उतरून वाहतुकीचे नियम कसे पाळावे यावर एक कला साधर केली यावेळी विद्यार्थी यांनी येणाऱ्या जाणाऱ्या वाहतूकदाराला तसेच नागरिकाला आपण प्रथम ट्रॅफिक सुरक्षा जागरूकता कसे पाळावे यावर मार्गदर्शन केले. याचे मुलं नियम जर आपण १८ वर्षाखाली असाल तर वाहन चालवू नका यावर आपल्याला आवश्यक परवानगी नाही.

जर आपण मादक द्रव्याच्या किंवा दारूच्या प्रभावाखाली असाल तर गाडी अजिबात चालवू नका, ड्रायव्हिंग करताना मोबाईल किंवा इतर कोणतेही वितरण वापरू नका, विनाकारण हॉर्न वाजवू नका विशेषतः रुग्णालय व शाळेजवळ, बाईकवर आणि कारच्या फ्रंट सीटवर लहान मुळे घेऊ नका, कार चालवताना नेहमी सीट बेल्ट लावा तसेच बाईक चालविताना हेल्मेट वापरा आपल्या सोबत असणाऱ्याला पण हेल्मेट वापरायला सांगा,पादचांऱ्याची, विशेषतः वृद्ध आणि अपगांची काळजी घ्या, आपली नजर प्रत्येक वेळी रस्त्यावर ठेवा, एकादी अबुलन्स जर येत असेल तर तिला प्रथम मार्ग द्या त्याच्यामध्ये असणारा सिरीयस पेशन्ट आपल्यामुळे वाचू शकेल अशा अनेक नियमाचे पालन कसे करता येणार यावर युनाटेड इंग्लिश स्कूल मोर्बा च्या स्कूल ने मोर्बा विभागात रस्त्यावर उतरून नागरिकांना दारू पिऊन वाहन चालवितो, यमराज त्यांना हाक मारतो, ओव्हरटेक मारून करू नका घाई घरी वाट पाहते आपली आई, वाहतुक नियम पाळूया दुर्घटना टाळूया, वाहतूक नियमाचे पालन करण्याची शपथ घेऊया. अशा पद्धतीने मार्गदर्शन केले.

युनायटेड इंग्लिश स्कूल मोर्बा च्या कमिटी मेंबर्स,प्रिन्सिपल मिस. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here