चांदोरे येथे महाशिवरात्री उत्सव मोठ्या आनंदात साजरा.
✍️ नंदकुमार चांदोरकर ✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞 8983248048 📞
माणगाव :- माणगाव तालुक्यातील चांदोरे येथे शुक्रवार दिनांक ०८/०३/२०२४ रोजी मिती माघ कृष्ण १३ शके १९४५ रोजी सालाबाद प्रमाणे या वर्षी सुध्दा महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना पक्ष प्रतोद उपनेते तथा आमदार महाड विधानसभा मा. श्री.भरत शेठ गोगावले साहेब यांना निमंत्रित करण्यात आले.
महाशिवरात्री हा सण शिव आणि पार्वतीच्या लग्नाचे स्मरण करतो, आणि या प्रसंगी शिव त्याचे दैवी तांडव नृत्य करतो. हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो जीवनात आणि जगामध्ये “अंधार आणि अज्ञानावर मात करण्याचे” स्मरण आहे. या दिवशी शिवाचे स्मरण करतात आणि प्रार्थना, उपवास, नैतिकता आणि सद्गुणांचे मनन करून साजरा केला जातो. महाशिवरात्री हा एक वार्षिक हिंदू सण आहे जो भगवान शिवाचा सन्मान करण्यासाठी केला जातो. भगवान शिवाची पूजा करण्यासाठी हा वर्षातील अत्यंत पवित्र दिवस मानला जातो.
स्वयंभू शिव चॅरिटेबल ट्रस्ट चांदोरे आणि ग्रामसेवा समाज चांदोरे या उपरोक्त मंडळाच्या वतीने शुक्रवार दि.०८ मार्च २०२४ रोजी महाशिवरात्री दिनी अगदी सकाळ पासूनच काही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ५ : ०० वा.काकड आरती, स. ७ : ०० ते ९ : ०० वा. शिव पिंडीवर अभिषेक व पूजा, सरपंचताई साक्षी शिंदे व रेश्मा घोसाळकरताई यांच्या हस्ते करण्यात आले. स. ९ : ००ते १० : ०० वा.महाआरती, स.११ : ०० ते १ : ३० ग्रामस्थांचे सुस्वर भजन, दुपारी.१:३० ते ३:३० ह.ब.प.संदीप यादव महाराज शिवव्याख्याते यांचे किर्तन.(खालापूर) दुपारी. ३ : ३० ते ७ : ०० वा.भजन रात्रौ ७ :३० ते ८ : ३० वा.महाप्रसाद रात्रौ.८ : ३० ते १० : ०० वा.श्री दत्तगुरु प्रासादिक भजन मंडळ भजन काकल कोंड (स्वरगंध कोकण रत्न पुरस्कृत) यांच्या सुस्वर भजन. याप्रमाणे दिवसभरामधे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
चांदोरे हे पुरस्कृत गाव आहे. स्वच्छ्ता असो, सांस्कृतिक किंवा काही सामाजिक उपक्रम असो या गावातील सर्वच बांधव येकत्रित येवून आगदी मनापासून काम करीत असतात, आणि खरोखर या गावाकडून खुप काही घेण्या सारखे आहे, हे गाव एक प्रेरणादाई गाव आहे,
दि.०८/०३/२०२४ रोजी जो काही महाशिवरात्री उत्सव सोहळा संपन्न झाला या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी महाड विधानसभा मा. आमदार आमदार भरतशेठ गोगावले साहेब त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी, पंचायत समिति माजी सभापती मा.सुजित शिंदे, सरपंचताई साक्षी शिंदे, उपसरपंच, नथुराम चाचले साहेब चांदोरे ग्रामपंचायतीचे सर्व सभासद, स्थानिक मंडळाचे सर्व पदाधिकारी व सभासद बंधु, महिला मंडळ पदाधिकारी व सभासद तसेच मुंबई मंडळाचे पदाधिकारी व सभासद बंधु , त्याच प्रमाणे तरुण मंडळ तसेच पंच क्रोशितील तमाम शिव भक्त बहु संख्येने उपस्थीत होते.