जी.आर.आय.एल कंट्रक्शन कंपनीच्या अंधारातील अवैघ उत्खननावर महसूल पोलीसाची संयुक्त धाड पाच रेती भरलेले हायवा एक पोकलेन जप्त ( पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांच्या सतर्कतेचा परिणाम )

जी.आर.आय.एल कंट्रक्शन कंपनीच्या अंधारातील अवैघ उत्खननावर महसूल पोलीसाची संयुक्त धाड पाच रेती भरलेले हायवा एक पोकलेन जप्त ( पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांच्या सतर्कतेचा परिणाम )

जी.आर.आय.एल कंट्रक्शन कंपनीच्या अंधारातील अवैघ उत्खननावर महसूल पोलीसाची संयुक्त धाड पाच रेती भरलेले हायवा एक पोकलेन जप्त
( पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांच्या सतर्कतेचा परिणाम )

जी.आर.आय.एल कंट्रक्शन कंपनीच्या अंधारातील अवैघ उत्खननावर महसूल पोलीसाची संयुक्त धाड पाच रेती भरलेले हायवा एक पोकलेन जप्त ( पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांच्या सतर्कतेचा परिणाम )

[मनोज गोरे चंद्रपूर जिल्हाप्रतिनिधी ]

कोरपना :- प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या अधिपत्याखाली राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३ (बी) राजुरा-गोविंदपूर या मार्गाचे काम जी.आर.आय.एल कंट्रक्शन कंपनी यांच्या मार्फतीने मार्च २०२३ पासून युद्ध पातळीवर शासन पर्यावरण महसूल खनिकर्म विभागाचे सर्व नियम पायदळी तुडवीत मिळेल तेथून रेती,मुरूम,अविरत मंजूर क्षमतेपेक्षा अधिक उत्खनन झाल्याच्या अनेक तक्रारी शासन व महसूल खनिकर्म विभागाकडे असताना मात्र कंपनी नियमबाह्य मोठ्या प्रमाणात उत्खनन केल्याने शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल पाण्यात वाहून गेला अनेक अटी-शर्ती भंग करून या कंपनीने गेल्या १ वर्षात राजुरा-कोरपना तालुक्यातील १५ ते १६ नाल्यातील रेती,मुरूम,दगड उत्खनन करून वनपर्यावरण व जिल्हाधिकारी यांनी मंजुरी आदेशात दिलेल्या अटी-शर्ती भंग करून लाखो परिणाम ब्रास उत्खनन केल्यामुळे अनेक गावात नाले ओसाड झाले असून पाण्याचे स्त्रोत नष्ट झाल्यामुळे अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा टाकला आहे तर वन्यप्राणी व पाळीव प्राणी त्याच बरोबर शेतकऱ्याच्या सिंचनावर परिणाम झालेला आहे दिलेल्या अटी-शर्ती भंग करून गौण खनिजाचे उत्खनन सकाळी ६ ते सायं ६ या कालावधीत करणे बंधनकारक असतांना तसेच खनिज व धूळ सांडू नये म्हणून ताडपत्री झाकून खनिज वाहन करणे अनिवार्य आहे त्याच बरोबर जलसंधारण उपविभागीय अधिकारी यांच्या देखरेख मध्ये व सल्यानुसार करणे बंधनकारक असतांना तसेच मौका पंचनामा,सीमांकन न करता मिळेल त्या ठिकाणावरून अविरत उत्खनन करण्यात आले हा अनाधिकृत कारभार स्थानिक महसूल अधिकारी तसेच पोलीस व खनिकर्म विभाग यांना माहित असतांना या बाबीकडे दुर्लक्ष केल्यामुळे प्रत्यक्षात मान्यता व झालेले उत्खनन राष्ट्रीय महामार्गाचा गौणखनिज घोटाळा व्यापक प्रमाणात झाला आहे देवघाट नाल्यातील जिल्हाधिकारी यांनी पत्र क्र.२२६ दि.२४ मार्च २०२३ नुसार ५३००३.५३ परिणाम ब्रास उत्खननाची परवानगी २५ मार्च २०२४ पर्यंत मुदतीत गौण खनिज उत्खननाची परवानगी १ ते २२ अटी-शर्तीवर दिली या सर्व अटी-शर्ती भंग करून शेरज (खु) ते कारगाव पर्यंत १४ किलोमीटर संपूर्ण नाला पोखरला असून मंजूर उत्खनना पैकी प्राधिकरण व जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी कार्यालयीन पत्र क्र.खशा/कार्य -११ /खनिज/मा.अ./२०२३/१७७ दि.२७/१०/२०२३ रोजी ३१ मे पर्यंत ५३.००३.५३ यापैकी गौण खनिज परिणाम ब्रास ५३००१.७७ उपरोक्त आदेशानुसार जून पर्यंत उत्खनन झाल्याचे व गौण खनिज वापरल्याचे नमूद असतांना पावसाळ्यानंतर १५ सप्टे २०२३ पासून गेल्या ६ महिन्यात मंजुरी न घेता लाखो ब्रास अविरत देवघाट नाल्यावरून उत्खनन कोणाच्या आशीर्वादाने झाले तसेच जास्तीचे गौण खनिज उत्खनन झाल्यामुळे तसेच जलसंधारण अधिकार्याचे स्थळ पाहणी न करता उंटावरून शेळ्या राखण्याचा प्रकार टेबलवर बसून तयार करण्यात आलेले पंचनामे सीमांकन व उपयोगिता प्रमाणपत्र विवादाच्या चक्र व्यावूत अडकणार आहे अतिरिक्त गौण खनिज कंत्राटदारांनी ३० दिवसाच्या आत स्वामित्वधनाची रक्कम शासन जमा करणे बंधनकारक असतांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अधिनियम १९६६ मधील कलम ४८(७) नुसार कार्यवाही महसूल विभागाने का केली नाही हा प्रश्न लोकांना निर्माण झाला असून जिल्हाधिकारी विनय गौडा पोलीस अधिक्षक ममुका सुदर्शन यांना राष्ट्रीय महामार्गाच्या गौण खनिज घोटाळा होत असल्याचे माहित होताच दखल घेत कोरपना येथील तहसीलदार व्हाटकर ठाणेदार एकाडे हे आपल्या ताफ्यासह कुसळ येथील घाटावर देवघाट नाल्यावर रात्री ११ वाजता धार टाकून ५ भरलेले हायवा उत्खनन करित असलेली पोकलेन मशीन
१. खाली भरण्याच्या तयारीत असलेले हायवा वाहन १२ व हाड्रा मशीन १ दिसून आले ४ भरलेले वाहन नाल्यातून पडून जाण्यास यशस्वी ठरले ५ वाहन ताब्यात घेवून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले असून महसूल व पोलीस प्रशासन कोणती कार्यवाही करते याकडे सर्वांचे लक्ष लागले असून यापूर्वी परीक्षाविधीन आय.ए.एस अधिकारी रंजित यादव यांनी GRIL कंपनीचे २ वाहन जप्त करून रात्रचे उत्खनन बंद पाडले होते.सध्या जिल्ह्यामध्ये पोलीस अधिक्षक यांच्या धडक मोहिमेने अवैघ दारू,सट्टा-पट्टी,सुगंधित तंबाकू रेती तस्कर यांच्या मुसक्या आवडल्याने नागरीकांमध्ये समाधान व्यक्त करित असतांना कोट्यावधी रुपयाचा गौण खनिज चोरीने उत्खनन करून GRIL कंपनीवर कोणती कार्यवाही होते व रात्रचे अवैघ उत्खनन थांबनार का याकडे तालुक्याच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.