गौमांस विक्री करणाऱ्यांना रंघेहात पकडले
गडचिरोली इंदिरानगर येथील घटना
✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो. 8999904994
गडचिरोली:- शहरातील इंदिरानगर वार्डात गाईचे मांस विकणाऱ्या वर आज रविवार ला दुपारी १ वाजता धाड टाकून कारवाई करण्यात पोलिसांना यश आले आहे.आरोपी नौशाद याला पोलिसांनी अटक केली आहे. सह आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
इंदिरानगर येथील स्थानिक नागरिकांनी विश्व हिंदू परिषद च्या कार्यकर्त्यांना गाईचे मांस विक्री करत असल्याची माहिती दिली मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून गाईचे मांस विक्री करणाऱ्या नौशादला रंगेहाथ पकडण्यात आले.
आरोपी कडून ४० किलो जिवंत गाईचे मांस जप्त करण्यात आले तसेच घटना स्थळावरून एक टेम्पो वाहन क्रमांक MH-40-BG-9263 जप्त करण्यात आले तसेच त्याची ऍक्टिवा वाहन क्रमांक MH-33-AG-3813 जप्त करण्यात आले तसेच मांस कापण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य (तराजु , मास ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे कॅरेट) ही जप्त करण्यात आले.
सदर गाईचे मांस परीक्षणाकरिता पशुवैद्यकीय दवाखाना गडचिरोली येथे पाठविण्यात आलेले आहे.सदर कारवाई पोलीस उप निरीक्षक शरद मेश्राम यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे.
इंदिरानगर वार्डातील गाईचे मास विक्री प्रकरणी नौशाद वर आज गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी नौशाद याच्यावर यापूर्वी सुद्धा तीन ते चार ठिकाणी गाईचे मांस विक्री प्रकरणी अनेक गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे.
