पाचगाव येथे “जागतिक महिला दिनानिमित्त संवाद महिलांचा” कार्यक्रम संपन्न
✍🏻रत्नाकर भेंडे ✍🏻
राजुरा तालुका प्रतिनिधी
मो 9657647497
राजुरा :- आज दिनांक 8 मार्च 2025 ला मौजा पाचगाव येथे जागतिक महिला दिनाचे अवचित्य साधून महिला बचत गट, ग्रामसंघ पाचगाव व अंबुजा फॉउंडेशन, उत्तम कापूस च्या वतीने “जागतिक महिला दिन…..संवाद महिलांचा” कार्यक्रम आयोजित करण्यात आला . या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सौ. सुषमा शुक्ला JCI राजुरा रॉयल, कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून सौ. मधुस्मिता पाडी अध्यक्ष JCI rajura रॉयल हे उपस्थित होते.
तसेच व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून सौ. उज्वलाताई अकबरशाह आत्राम, उपसरपंच ग्रामपंचायत पाचगाव, सौ.अनिता गोपाल जंबुलवार अध्यक्ष ग्रामसंघ पाचगाव, सौ. कल्पना संजय सोनुर्ले सचिव ग्रामसंघ पाचगाव, सौ. सुनंदा देवराव डोंगे, कोषाध्यक्ष ग्रामसंघ पाचगाव, सौ. वर्षा चौधरी, शिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचगाव, सौ. पार्वताबाई विठ्ठल तलांडे सदस्य ग्रामपंचायत, सौ. कल्पना महेश काकडे सदस्य ग्रामपंचायत, सौ. मंदाताई मानकू कुमरे सदस्य ग्रामपंचायत पाचगाव, सौ. मालन किसन पाल, सौ. निशा रुपेश गेडेकर पेसा सदस्य पाचगाव, श्रीमती अर्चना रवी चलावार आशा वर्कर पाचगाव, सौ.मनीषा संदीप भेंडे, सी.आर.पी,ग्रामसंघ पाचगाव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन महिलांनी केले हे विशेष आहे. ग्रामीण भागातील अश्या प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच होत असल्याची चर्चा आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. माधुरीताई पिंपळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. मनीषाताई खाडे यांनी केले..
या कार्यक्रमांमध्ये महिलांनी आपल्या अंगी असलेले सुक्त कलागुण म्हणजेच डान्स, गीतगायन व अनुभव कथन केले.
कार्यक्रमातील स्पर्धेसाठी बक्षीस सौ.सुनंदाताई डोंगे व अंबुजा फाउंडेशन यांचेकडून देण्यात आले. तसेच मधुस्मिता पाडी, अध्यक्ष JCI राजुरा रॉयल यांचेकडून ग्रामसंघाला हॅलोजन भेट देण्यात आले. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना ग्रामसंघाकडून प्रमाणपत्र देण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व महिला बचत गटाच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.
