जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा
वनप्रकल्प विभाग ब्रम्हपूरी एफ.डी.सी.एम.अंतर्गत महिला कर्मचारी/ अधिकारी यांचेतर्फे सिंदेवाही विक्री आगार येथे संपन्न
✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो. 8999904994
गडचिरोली :- आज दिनांक 8 मार्च 2025 वनप्रकल्प विभाग ब्रम्हपूरी एफ.डी.सी.एम.अंतर्गत महिला कर्मचारी/ अधिकारी यांचेतर्फे सिंदेवाही विक्री आगार येथे जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा.अभिषेक अजेस्र वनपरिक्षेत्र अधिकारी सिंदेवाही FDCM, विशेष अतिथी हणून त्यांच्या सहचारीनी मा. सौ.स्नेहल अजेस्र गटविकास अधिकारी पं.स. नागभीड, प्रमुख अतिथी म्हनूण मा. वर्षा पेंद्राम वनपरिक्षेत्र अधिकारी पाथरी, मा. विधाते मॅडम वनपरिक्षेत्र अधिकारी वडसा आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या मा. सौ.स्नेहल अजेस्र यांनी आपल्या मार्गदर्शनातून महिलांनी स्वावलंबी राहून आत्मनिर्भर बनावे, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अभिषेक अजेस्र यांनी घरापासूनचं स्री-पुरूष समानतेचा अवलंब करावे आणि महिल्यांच्या विकासासाठी षुरूष वर्गाने महिलांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे, असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. पेंद्राम व.प.अ. पाथरी यांनी केले
सूत्रसंचालन कु. अन्नपुर्णा शिडाम वनरक्षक यानी केले. आणि आभार कु.मनिषा कदम यांनी मानले.
