पोहणा येथे लसीकरणात गावकर्‍यांचा उत्पूर्त प्रतिसाद.

प्रा. अक्षय पेटकर, प्रतिनिधी ✒
पोहणा:- वर्धा जिल्हातील हिंगणघाट तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केन्द्र पोहणा येथे कोविड प्रतिबंधक लसिकरणास नुकतीच दि.०१ एप्रिलपासून सुरूवात झाली असून परिसरातील गावातील जेष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षावरील लाभार्थ्यांनी लसिकरण करुन घेण्याचे आवाहन वैद्यकिय अधिकारी डॉ नितल भोला यांनी केले आहे.

प्राथमिक आरोग्य केन्द्र पोहणा अंतर्गत आरोग्य वर्धीनी केंद्र ढिवरी पिपरी येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सचिन महाजन, सरपंच सौ हर्षला कोरडे उपसरपंच मधुकर ढवस, ग्रा पं सचिव श्री. भोयर आरोग्य सेविका सौ. आडेवार आरोग्य सेवक श्री. कलोडे,आशा स्वयंसेविका सौ देऊळकर इत्यादिसह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी गावात घरोघरी जाउन कोविड प्रतिबंधक लसिकरणाबद्दल जनजागृती केली. गावकऱ्यांनीसुद्धा यावेळी उत्तम प्रतिसाद दिला.

ग्रामपंचायत ढिवरी पिपरी सौजन्यातून गावकऱ्यांना लसिकरण केंद्रात जाण्यासाठी वाहनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. गावातील जेष्ठ नागरिक तसेच इतर लाभार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केन्द्र पोहणा येथे कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here