मुख्यमंत्र्यांनी दिलेला आदेश मागे घ्यावा, वणी भाजपा व्यापारी आघाडीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

त्रिशा राऊत, चिमूर तालुका प्रतिनिधी
चिमूर:- वणी भाजपा व्यापारी आघाडीने दिनांक 07 एप्रिल 2021 रोजी महाराष्ट्र शासनाने घेतलेला लॉकडाऊन चा निर्णय मागे घ्यावा याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना वणी तहसीलदारामार्फत निवेदनातून मागणी करण्यात आली.

महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार 30 एप्रिल पर्यंत सर्वच दुकाने मॉल व बाजारपेठ बंदचे आदेश दिले आहे. मागील 1 वर्षभरापासून कोरोना संकटाने मानवी जीवन धोक्यात सापडले असुन या संकटा सोबतच सुलतानी संकटाने नागरिक त्रस्त आहेत .कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. त्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन सदृश्य निर्बंध लावल्यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे व गरीब जनता ही बेहाल स्थितीत आहे. मजूर, कामगार, व्यापारी, लघु उद्योजक, गॅरेज मालक, सलून, हॉटेलव्यावसायिक तसेच या व इतर छोट्या मोठ्या व्यवसायांवर अवलंबून असणाऱ्यांचा विचार महाराष्ट्र शासनाने करावा त्यामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊन सदृश्य निर्बंधाचा फेर विचार करून आदेश मागे घ्यावा ही मागणी वणी व्यापारी आघाडी भाजपा यांंनी दिनांक 07।04।21 रोजी व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळाने भेट घेऊन निर्बंध उठविण्याची मागणी तसेच आदेश मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून यासंदर्भात निर्बंधाचा सर्व समावेशक आदेश मागे घ्यावी ही मागणी केली आहे .यावेळी भाजपा चे जिल्हा महामंत्री रविभाऊ बेलूरकर, शहर अध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्ष लवलेश लाल, सरचिटनिस संदीप मदान, उपाध्यक्ष रवि रेभे व सुधीर साळी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here