पाच वेळा विदर्भ केसरी असलेले खासदार लाभून सुद्धा वर्धा जिल्ह्यातील पैलवानकी संपृष्टात येण्याच्या मार्गावर.

✒करण विटाळे✒
हिंगणघाट तालुका ग्रामीण
प्रतिनिधी:8806839078

हिंगणघाट : येथील स्थानिक आमदार व जिल्ह्याचे खासदार हे एकेकाळी नामांकित पैलवान असूनही आज हिंगणघाट मधील पैलवानकी संपृष्टात.
हिंगणघाट येथील अनेक वर्षांपासून सुरू असलेली पैलवानकी आज नाहीसी होताना दिसत आहे. त्यामुळे तालुक्यातील कुस्तीप्रेमी व पैलवानांमध्ये तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मा. खासदार साहेबांनी अनेकदा आश्वासने करूनही पैलवानांसाठी आजपर्यंत जिल्ह्यात कुठेही कुस्ती तालीम हे उभी केलेली नाही. साहेबांनी फक्त आणि फक्त लोकांना दाखविण्यापूरतीच २०२१/२२ विदर्भ केसरी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा हे आपल्या मुळ गावी देवळी येथे आयोजित केली परंतु जिल्ह्यातील एकाही पैलवानाने त्यामध्ये पदक पटकावले नाही. तर केवळ हे स्पर्धांचे आयोजन काय उपयोगात? असा प्रश्न पैलवान समोर मांडत आहेत.
यासाठी मा. ना. खासदार साहेब यांच्या विकास निधीतून लवकरात लवकर जिल्ह्यातील पैलवानांसाठी एक कुस्ती संकुल व उत्तम असे मार्गदर्शक (कोच) आम्हा मिळावे असे हिंगणघाट येथील पैलवानांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here