वेकोली दुर्गापूर परिसरात नरभक्षक बिबट्याला जेरबंद

वेकोली दुर्गापूर परिसरात नरभक्षक बिबट्याला जेरबंद

वेकोली दुर्गापूर परिसरात नरभक्षक बिबट्याला जेरबंद

✍🏻हेमा मेश्राम✍🏻
दुर्गापूर प्रतिनिधी
मो नं.9356653707

दुर्गापूर:- काही महिन्या पासून धुमाकूळ माजवून ठेवलेल्या बिबट्याला अखेर केलं जेरबंद. दुर्गापूर परिसरात काही काही दिवसा पूर्वी समता नगर इथे प्रतीक शेषराव बावणे या आठ वर्षीय बालकाला उचलून नेऊन ठार केले होते त्या बिबट्याला पकडण्यात यश आले आहे.आज 9 एप्रिल रोजी बेकोली परिसरात त्या बिबट्याला पकडण्यात यश आले आहे.

30 मार्च रोजी रात्री 9 वाजताच्या दरम्यान दुर्गापूर परिसरात समता नगर येते बालक खेळत असताना बिबट्याने त्याला उचलून नेते.बालकाला फरफट जंगलात नेऊन त्याने मुंडके धडापासून वेगळे केले होते.
या घटना नंतर नागरिकांनी उपक्षेत्रिय कार्यालयात मोर्चा देखील काडला होता.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चंद्रपूर वन विभागाचे विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे आणि त्यांच्या पथकाने या परिसरात पिंजरे लावले होते. सतत आठ दिवसा पासून या परिसरात मद्ये बिबट्याची दहशत सुरू होती.आज 9 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास हा बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.