आदित्य कृषी व संलग्न महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीर संपन्न
✒श्याम भुतडा✒
बीड जिल्हा प्रतिनिधी
9404118005
बीड : -वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी व आदित्य शिक्षण संस्था बीड संचलित अंतर्गतआदित्य कृषी,कृषी अभियांत्रिकी,अन्नतंत्रज्ञान आणि जैव तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथील विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय सेवा योजना दि. 10 मार्च २०२२ ते 16 मार्च २०२२ दरम्यान पाली ता. जि. बीड येथे विशेष श्रमदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सात दिवसाच्या श्रमदान
कार्यक्रम राबविण्यात आले होते. यामध्ये ग्रामस्वच्छता अभियान, माझा वसुंधरा अंतर्गत वृक्ष लागवड, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती निर्मुलन,कोरोना लस फायदे, जल संधारण फायदे, बीज प्रक्रिया महत्त्व, रक्तदान शिबिर इत्यादी उपक्रमातून प्रबोधन करण्यात आले. यामध्ये गावातील दर्शनीय ठिकाण, मंदिर, ग्रामपंचायत इत्यादी ठिकाणी स्वंयसेवकामार्फत स्वच्छता करण्यात आली. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत एक विद्यार्थी एक झाड संकल्पनेअंतर्गत शिबीरामध्ये ग्रामसमृद्धी विशेष वृक्षारोपण करण्यात आले. कृषी शिक्षणाचे महत्त्व बाबत व वयक्तिक स्वच्छता बाबत रॅली काढून शिबीराची सांगता करण्यात आली सदरील कार्यक्रमास गावचे सरपंच,उपसरपंच व ग्रामस्थांनी सहकार्य केले .सदरील सदरील यशस्वी करण्यासाठी सर्व महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी ,विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले .सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य याच्या मार्गदर्शन खाली शिबिर संपन्न झाले