केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्ती हक्क 2016 नुसार सर्व दिव्यांग प्रमाणपत्र धारक व्यक्तींना 5 % निधी तात्काळ वाटप करण्यात यावे : स्वप्निल सोनटक्के
✍सौ हनिशा दुधे✍
बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
97642 68694
विसापुर : विसापूर ग्रामपंचायत अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना मागील 2 वर्षापासून 5% निधी वाटप केलेला नाही तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार ज्या व्यक्तीकडे ऑनलाईन पद्धतीने केलेले प्रमाणपत्र आहे अशाच पात्रताधारक व्यक्तींना निधी देण्यात यावे. ज्या व्यक्तीकडे ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपत्र बनविले नाही त्यांना ग्रामपंचायत मार्फत संपूर्ण माहिती देण्यात यावी व दिव्यांग निधीचे तात्काळ वाटप करण्यात यावे अशी मागणीचे निवेदन ग्रामपंचायत विसापूर चे ग्राम विकास अधिकारी व सरपंच यांना वंचित बहुजन आघाडी चे पंचायत समिती विसापुर निरीक्षक, सिकलसेल अँड थॅलेसेमिया सोसायटी ऑफ चंद्रपुर चे सदस्य स्वप्नील सोनटक्के यांनी केली सोबतच प्रथम दुपारे, गुंजन वानखेडे, निलजय गावंडे, सिद्धांत पुणेकर, दीपक पुडके आदी कार्यकर्ते उपस्थित होते