शामरावबापू कापगते स्मृति प्रतिष्ठान नागपूर येथे सन्मानित
आशिष चेडगे
साकोली तालुका प्रतिनिधी
8605699863
साकोली : महाराष्ट्र बँक ट्रस्टी कंपनीतर्फे दि. ०८ एप्रिलला संपन्न कार्यक्रमात साकोलीतील उत्कृष्ठ आरोग्यसेवा कार्यातून पर्यावरणाचा संदेश जनाजनात देणा-या शामरावबापू कापगते स्मृति प्रतिष्ठानला स्मृतिचिन्ह पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार डॉ. हेमकृष्ण कापगते यांनी स्विकार करून आयोजकांचे आभार मानले आहे.
दि महाराष्ट्र एक्झिक्यूटर एण्ड ट्रस्टी यांच्या आयोजित कार्यक्रमात साकोली येथील शामरावबापू कापगते स्मृति प्रतिष्ठान पुरस्काराचे मानकरी ठरले. याप्रसंगी विभागीय झोनल अधिकारी वैभव काळे, ओंकार कुमार, श्री थॉमस, माजी बँक व्यवस्थापक लपालीकर, विनय पांडे, विजय गडकरी आदी हजर होते. सदर गौरव पुरस्कार डॉ. हेमकृष्ण कापगते यांनी स्विकारला. ही ट्रस्टी ७५ वर्षापासून मुंबई दादर, ठाणे, पुणे येथे यांचे सतत सुरू आहे. याप्रसंगी डॉ. हेमकृष्ण कापगते यांनी सांगितले की आजपर्यंत शामरावबापू कापगते स्मृति प्रतिष्ठानवतीने रोगनिदान व निशुल्क औषध १७१ शिबिरे, हॉयड्रोसिल शस्त्रक्रीया ३८ शिबिरे, ऑपरेशन ३७७, नेत्र तपासणी ८४ शिबिरे व २२०५ चष्मे वाटप, रक्तदान साकोलीत ३२, एकुण १२२ शिबिरे व रक्तदाते २११८ आणि कोरोनायोद्धांचा सत्कार, केशव चिकीत्सालय वडेगाव १९८७ पासून २५ वर्ष पूर्ण वेळ मोफत सेवा, प्रतिष्ठानवतीने एकुण विविध पुरस्काराचे मानकरी १००० व्यक्तींचा स्मृतिचिन्ह रोख रक्कम देत गुणगौरव, मरणोत्तर नेत्रदान ३० व्यक्ती, देहदान सुधाकर भुजाडे साकोली, पर्यावरण मार्गदर्शनात १११ ठिकाणी असे विविध उपक्रम राबविण्यात येत असून हा पुरस्कार याच कामांची पावती असल्याचे सांगितले. कार्यक्रमात संचालन पल्लवी श्रीराम यांनी केले तर प्रास्ताविक व आभार विनय पांडे यांनी केले.