मौजा खराशी येथे आईला शिवीगाळ केली म्हणून मुलाने केला वडिलांचा खून
✍ भवन लिल्हारे ✍
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8308726855,8799840838
लाखनी :- भंडारा जिल्हा लाखनी तालुक्यातील मौजा खराशी येथे दिनांक ७ एप्रिल २०२२ रोज गुरुवारला मध्यरात्री आईला शिवीगाळ केल्याने संतप्त झालेल्या मुलाने वडिलांच्या डोक्यावर बांबुच्या काठीने प्रहार करून खुन केल्याची घटना लाखनी तालुक्यातील मौजा खराशी येथे घडली.
पालांदुर पोलीसांनी मुलाला अटक करुण न्यायालया पुढे सादर केले असता न्यायालयाने ४ दिवशाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेन लाखनी तालुक्यात एकच खळबळ उडाली असुन गावकरीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत व्यक्तीचे नाव बाबुराव गणा कहालकर वय ६८ वर्षे रा. खराशी, ता. लाखनी, जिल्हा भंडारा असे मृत वडिलाचे नाव आहे. तर मंगेश बाबुराव कहालकर वय २८ वर्षे असे आरोपी मुलाचे नाव आहे.
वडिल बाबुराव व मुलगा मंगेश यांच्यात नेहमिच दारुच्या नशेत वाद होत असे. गुरुवारी सायंकाळी दोघेही दारु पिऊन घरी आले. बाबुरावाने आपली पत्नी सुमन हिला वाईट वाईट शिवागाळ देन सुरु केले. आईला वाईट वाईट शिवेगाळ सहन होत नसल्याने मुलगा मंगेश संतप्त झाला. व त्याने रागारागात घरातून बांबुची काठी आणून वडिल बाबुरावला मारहान सुरु केली. काठीचा जोरदार प्रहार डोक्यावर झाल्याने ने रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर पडले. घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी कहालकर यांच्या घराकडे धाव घेतली. शेजारांच्या मदतीने उपचारासाठी बाबुरावला पालांदुर च्या ग्रामिण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी चेक केले असता तपासनिमध्येच बाबुरावाला मृत घोषीत केले.
या घटनेची माहिती पालांदुर पोलीस स्टेशन ला देण्यात आली.
ठानेदार सुधिर बोरकुटे यांनी आपल्या पथकासह मौजा खराशी येथे धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा केला. मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी मंगेश कहालकर याला घरानुणच ताब्यात घऊन अटक केली. आई सुमनच्या तक्रारीवरूण पोलीसांनी भादवी ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले. व शुक्रवारी अटक करून लाखनी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ४ दिवशाची म्हणजे ११ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास ठानेदार सुधिर बोरकुटे हे करीत आहे.