पाणीटंचाईच्या प्रश्नावर महापालिकेत बैठक

 पाणीटंचाईच्या प्रश्नावर महापालिकेत बैठक

पाणीटंचाईच्या प्रश्नावर महापालिकेत बैठक

बालाजी पाटील
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
94204 13391
9421808760

नांदेड : आगामी काळातील सण, उत्सव लक्षात घेता शहरात कोणत्याही प्रकारची पाणीटंचाई निर्माण होणार नाही. शहरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊ नये, या अनुषंगाने महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने योग्य ती खबरदारी घेत प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना महापौर जयश्री निलेश पावडे यांनी शुक्रवारी (ता. आठ) दिल्या आहेत.

नांदेड वाघाळा महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची महापौर पावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आढावा घेण्यात आली. या बैठकीला आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपमहापौर अब्दुल गफ्फार, अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे, उपायुक्त शुभम क्यातमवार, डॉ. पंजाबराव खानसोळे, कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, नगरसेवक आनंद चव्हाण, राजू यन्नम, संतोष मुळे, सखाराम तुपेकर, धम्मा कदम आदींची उपस्थिती होती. यावेळी महापौर पावडे यांनी शहरात होणाऱ्या पाणीपुरवठा बाबतीत पाणीपुरवठा विभागाचा आढावा घेतला.

आगामी सण, उत्सव आणि जयंतीच्या अनुषंगाने योग्य पाणी पुरवठा करता यावा, यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना करत जलवाहिनीतून होणारी पाण्याची गळती थांबवावी. शहरात असलेले ७५४ हातपंप दुरुस्तीच्या बाबतीत उपाययोजना कराव्यात. २५९ विंधन विहिरीचे हातपंप दुरुस्ती व देखभाल दुरुस्ती करावी, असे सांगितले. विष्णुपुरी प्रकल्पातील सध्याचा पाणीसाठा लक्षात घेता नांदेड शहरावर पाणीटंचाईचे सावट येणार नाही. परंतु संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता महापालिकेच्या वतीने गरज पडल्यास टॅकरने पाणीपुरवठा करण्याची तयारीही पाणीपुरवठा विभागाने ठेवावी. यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री सज्ज करावी, अशा सूचनाही महापौरांनी यावेळी दिली.