सण, उत्सव एकोप्याने साजरा करण्याचा निर्धार
बालाजी पाटील
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
94204 13391
9421808760
नांदेड : आगामी काळात श्रीराम नवमी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुड फ्रायडे, हनुमान जयंती, महाराष्ट्र दिन, समजान ईद, अक्षय तृतीया, बुध्द पौर्णिमा आदी महत्वाचे सण आणि उत्सव जिल्हाभरात साजरे होणार आहेत. सर्व धर्मियांमधील परस्पर सहकार्य, सहिष्णुता, एकोपा हा आजवर सर्वांनी जपला आहे. कोविड काळातही आपल्या जिल्ह्याने मानवतेचे अनोखे दर्शन देवून एकमेकांची सेवा केली आहे. या एकात्मतेच्या भक्कम पायावर येत्या महिन्यातील सर्व धार्मिक उत्सव व जयंती नांदेड जिल्हावासी तेवढ्याच समजुतदारपणे उत्साहात साजरे करतील, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे शुक्रवारी (ता. आठ) आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी महापौर जयश्री पावडे, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे, तहसीलदार किरण अंबेकर यांच्यासह अधिकारी व सर्व धर्मियांचे शांतता समितीचे सदस्य यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन म्हणाले की, गेल्या दोन वर्षापेक्षा अधिकचा काळ हा नागरिकांनी कोरोनाच्या सावटाखाली असूनही संयमाने व जबाबदारीने पूर्ण केला आहे. हेच जबाबदारीचे भान येत्या काळातही नांदेडकर जपतील. उत्सव साजरा करताना रक्तदानाच्या चळवळीत स्वयंस्फूर्त सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. वाहनफेरी काढण्याआधी त्या वाहनाची आधी तपासणी करुन संबंधित यंत्रणेचे प्रमाणपत्र घ्यावे लागेल, असे पोलीस अधिक्षक शेवाळे या