भयभीत नांदेडकर; कडक उन्हाळा तरी होट्टल उत्सव होणार साजरा

भयभीत नांदेडकर; कडक उन्हाळा तरी होट्टल उत्सव होणार साजरा

भयभीत नांदेडकर; कडक उन्हाळा तरी होट्टल उत्सव होणार साजरा

बालाजी पाटील
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
94204 13391
9421808760

नांदेड : तत्कालीन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या संकल्पनेतून होट्टल उत्सव नांदेडकरांसाठी सांस्कृतिक मेजवानी ठरली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे होट्टल उत्सव साजरा करण्यात आला नव्हता. यावर्षी मात्र या महोत्सवाच्या आयोजनासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाकडून १० लाख रुपये तर आमदाराच्या स्थानिक विकास निधीतून २० लाख रुपयाचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. त्यामुळे यंदाचा महोत्सव हिवाळ्याऐवजी उन्हाळ्यात करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. सध्या नांदेड जिल्ह्याचा तापमानाचा पारा ४१ अंशापुढे सरकला आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत उन्हाची दाहकता जाणवत आहे. गेल्या आठ दिवसांपासून नांदेड शहरामध्ये विविध खूनासह गोळीबाराच्या घटना घडत असल्यामुळे नांदेडकर भयभीत झाले आहेत. अशा अवस्थेत होट्टल उत्सव झाला पाहिजे का, याबाबत नांदेडकरांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

आजपासून ११ एप्रिलपर्यंत तीन दिवस हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनातील अनेक अधिका-यांना रोजचे काम सोडून या उत्सवाच्या कामासाठी दावणीला बांधण्यात आले आहे. एकीकडे कडक उन्हाळा दुसरीकडे उत्सवाच्या लगबग यामुळे अधिकारी, कर्मचारीदेखील हा महोत्सव आमच्या मुळावरच आला आहे, अशा प्रतिक्रिया देत आहेत. वास्तविक पाहता हा महोत्सव हिवाळ्यात साजरा झाला असता तर सर्वांनाच आनंद घेता आला असता परंतु जिल्हा प्रशासनाच्या बालहट्टामुळे भर उन्हाळ्यात हा कार्यक्रम ठेवण्यात आल्याने चर्चेला उधाण आले.