तोहगाव येथील वाघाने ठार केलेल्या बैलाची तात्काळ नुकसान भरपाई मीळावी यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी बोबडे यांचे प्रयत्न
यानंतर असे हल्ले होऊ नयेत म्हणून क्षेत्रातील गावात दवंडी व जंगलात ट्राॅप कॅमेरा लावून देखरेख …व प क्षे अधीकारी बोबडे
राजेंद्र झाडे
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :- तोहोगाव गावालगत शेतीमध्ये असलेल्या गोठ्यात दी 7/4/2022 रोजी वाघाने बैलास ठार केल्याबाबत तोहोगाव गावातील गावकऱ्यांनी भ्रमणध्वनी वरून दिलेल्या माहितीनुसार वनपरिक्षेत्र अधिकारी क्षेत्र तोहोगाव बोबडे साहेब ..पी ए मडावी वनरक्षक व धाबा वनपरीक्षेत्रातील वनरक्षक यांचे सोबत घटनास्थळी पाहणी केली असता वाघाने बैलास जागीच ठार केल्याचे मोकास्थळी दिसुन आले मा श्रीकांत पवार स हा वनरक्षक ( वनी व वन्यजीव ) घटनास्थळी भेट देवून संबंधित व्यक्तीला नुकसान भरपाईची रक्कम तातडीने मिळावी अस्या सूचना दिल्या तसेच यापूर्वी सुद्धा तोहोगाव उपक्षेत्रात वाघाची दहशत सूरू असून पाळीव जनावरांना वाघाने ठार / जखमी केल्याची घटना झालेली आहे माझी चमु पोलिस अधिकारी कोठारी पोलिस अधिकारी गोंडपिपरी rru यूनीट कोठारी fdcm तोहोगाव यांचे सोबत गस्त करुन कॅमेरा ट्रॅप लावुन वाघाचा मागोवा घेण्यात येत आहे तसेच यानंतर असी घटना होवू नये म्हणून सदर क्षेत्रात गावात जनजागृती बाबत बॅनर लावण्यात आले तसेच दवंडी देण्यात आली जवळपास दबा धरून बसलेल्या वाघास जंगलाच्या दिशेने पाठवण्यासाठी फटाके फोडण्यात आले व नेहमी गस्त सुरू आहे सदर प्रकरणात पुढील कार्यवाही मा श्वेता बोंड्डू उपनिरीक्षक मध्य चांदा वनविभाग चंद्रपूर व मा श्रीकांत पवार सहा वनरक्षक ( वनी व वन्यजीव ) यांचे मार्गदर्शनाखाली सूरु आहे