राज्य सरकारला राज्य चालविता येत नसेल तर सत्तेतुन लवकर बाहर व्हा शेतकऱ्यांचा बळी घेऊ नका ? ही सरकार शेतकऱ्यांच्या हिताची नाही. लोडशेडिंग मुद्यावर माजी खासदार मा. शिशुपाल पटले संतापले

राज्य सरकारला राज्य चालविता येत नसेल तर सत्तेतुन लवकर बाहर व्हा

शेतकऱ्यांचा बळी घेऊ नका ? ही सरकार शेतकऱ्यांच्या हिताची नाही.

लोडशेडिंग मुद्यावर माजी खासदार मा. शिशुपाल पटले संतापले

राज्य सरकारला राज्य चालविता येत नसेल तर सत्तेतुन लवकर बाहर व्हा शेतकऱ्यांचा बळी घेऊ नका ? ही सरकार शेतकऱ्यांच्या हिताची नाही. लोडशेडिंग मुद्यावर माजी खासदार मा. शिशुपाल पटले संतापले

✍ भवन लिल्हारे ✍
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8308726855,8799840838

भंडारा गोंदिया :- विदर्भातील भंडारा, गोंदीया जिल्हा हा शेतकऱ्यांचा धान पिक काढण्यासाठी अव्वल आहे. तरीपण या भंडारा, गोंदिया, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली आहे. आता धान पीक गर्भावस्थेत असतांनाच विज महावितरण कंपनी कडून गत दोन दिवशा पासुन कृषी फिडरला २१ तासाचे भारनियम केले जात आहे. यावर्षीच्या खरीप व रब्बी हंगामातील फसल शेतकरीने मोठ्या प्रमाणावर लावला आहे. पण यावर्षीच्या कमी फसली मुळे,
जंगली जनावरांपासुन होणाऱ्या नुकसानीमुळे, वेळेवर न होणारे धानाचे चुकारे, राज्य सरकार कडून बंद केलेला बोनस अशा अनेक कारणांनी शेतकरी आर्थिक अडचणीत असतांना देखील येत रोवणीचे वेळी विजेचे कनेक्शन कापून त्यांच्या अडचणीत भर टाकली आहे.
तरीपण शेतकऱ्यांनी घरचे दागीने विकून व गहान ठेऊन विज वितरण कंपनीला पैसे दिले. पुन्हा दोन दिवशापासुन आकस्मिक भारनियमनाचा नावाखाली शेतकऱ्यांना फक्त २ ते ३ तासच विज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे दिड महिन्यांपासून मेहनत करून हातात आलेली उन्हाळी धान फसल संपुष्टात येऊन शेतकऱ्यांचा वर्षभराचा पास हा हिरावला जात आहे. सरकारला अशावेळी शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असतांना उलट भारनियमन करून त्यांना आथिर्क संकटाचे खाईत ढकलण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. असे आरोप माजी खासदार शिशुपाल पटले यांनी लावला आहे.
सरकारच्या निस्काळजीपणा व चुकिच्या नियोजनांमुळे शेतकऱ्यांवर हे शंकट आले आहे. धान उत्पादक शेतकरी भंडारा, व गोंदीया जिल्ह्यात हि लोडशेडींग बंद करावी अशी मागणी शिशुपाल पटले यांनी राज्य सरकारला केली आहे. जर सरकारला राज्य चालविता येत नसेल तर सत्तेतुन लवकर बाहर व्हा असे आव्हाहन केले आहे. पण शेतकऱ्यांचा बळी घेऊ नका, ही सरकार शेतकऱ्यांचा हिताची नाही अशा सणसणीत आरोप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार शिशुपाल पटले यांनी राज्याच्या महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.
शेतकऱ्यांची समस्या ही या देशाची समस्या आहे. भारत देश हा कृषीप्रधान देश असुन या देशात शेतकऱ्याची ही दयनिय अवस्था का झाली आहे ? अशा प्रश्न शेतकर्यांच्या वतीने मा माजी खासदार शिशुपाल पटले यांनी सासनाला विचारले आहे.