रायगड जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील ४६१ धोकादायक कारखान्यांमधून ९०,००० कामगारांचा जीव धोक्यात
✍रेश्मा माने ✍
महाड शहर प्रतिनिधी
८६००९४२५८०
रायगड : – महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील पनवेल, तळोजा, खोपोली, अलिबाग, रोहा, धाटाव, माणगाव, महाड, बिरवाडी या ठिकाणी असणाऱ्या रासायनिक व प्रदूषणकारी ४६१ कारखान्यांमधून ९० हजार कामगार आपला जीव धोक्यात घालून काम करत असून या धोकादायक परिस्थितीत काम करणाऱ्या कामगारांच्या जीवाशी खेळण्याचा उद्योग कंपनी व्यवस्थापन करीत असून सुरक्षेच्या कोणत्याही उपाय योजना करीत नसल्यामुळे कामगार वर्ग कमालीचा बेजार झाला असून स्थानिक पुढाऱ्यांच्या दडपशाहीमुळे कामगार वर्ग नाहक भरडला जात असल्याचे चित्र या औद्योगिक वसाहतींमध्ये पाहण्यास मिळत आहे.
रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्र औद्योगिक वसाहतींमधील पनवेल, तळोजा, खोपोली, रोहा, माणगाव, महाड, बिरवाडी या औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदूषणकारी अतिधोकादायक विषारी रसायन मिश्रीत कारखान्यांमधून भविष्यामध्ये भोपाळची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. औद्योगिक वसाहती मधील कारखान्यांमधून निघणाऱ्या अतिधोकादायक व ज्वलनशील पदार्थ आरोग्यास अपायकारक असणाऱ्या घातक उत्पादनांच्या निर्मिती मधून कारखानदार आपले उद्दिष्ट्य साध्य करत आहेत. मात्र त्यामुळे रायगड जिल्ह्यातील हवामानावर विपरित परिणाम होत आहे. औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कारखाने प्रदूषण करत असताना मात्र प्रदूषण रोखण्यात प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून कोणती उपाययोजना होत नाही हे औद्योगिक वसाहतीमध्ये घडणाऱ्या घटनांवरून सिद्ध होत आहे. कामगारांना सुरक्षेच्या उपाययोजना करण्याकडे व सुरक्षित उपकरणे देण्याबाबत कंपनी व्यवस्थापन ज्या प्रमाणात चालढकल करत आहे त्यावर अंकुश ठेवण्यात राज्य शासनाच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय कमी पडत आहे.
रायगड जिल्ह्यातील पनवेल, तळोजा, खोपोली, अलिबाग, रोहा, धाटाव माणगाव (विळे – भागाड), महाड, बिरवाडी या औद्योगिक वसाहतीमध्ये अतिधोकादायक ७० कारखाने असून त्यामध्ये ४४ हजार ६८८ कामगार काम करीत आहेत तर रासायनिक ४९९ कामगार असून ४४ हजार २७९ कामगार काम करीत आहेत तर धोकादायक ३९१ कारखान्यातून ४१ हजार ९५० कामगार काम करत आहे तर ६३४ इतर कारखाने असून त्यामध्ये ३७ हजार ४५४ कामगार काम करत आहे. सन २०१९ मध्ये या औद्योगिक वसाहतीमध्ये ६८ अतिधोकादायक कारखाने ४१६ रासायनिक ३०४ धोकादायक व अन्य १७७ कारखाने असल्याचे उघड झाले तर सन २०२० मध्ये ६३ अतिधोकादायक कारखाने २०२ रासायनिक कारखाने १९२ धोकादायक कारखाने व तेवीस इतर कारखाने असल्याचे स्पष्ट झाले सन २०२१ मध्ये सत्तर अतिधोकादायक कारखाने १४६ रासायनिक कारखाने ११६ धोकादायक कारखाने व १३ अन्य कारखाने असल्याचे उघड झाले
रायगड जिल्ह्यात सन २०१९ मध्ये ७२ कारखाने नोंदणी व परवाने धारक आहेत तर सन २०२० मध्ये ५३ व २०२१ मध्ये ७० कारखाने नोंडणी व परवाना असल्याचे स्पष्ट झाले तर २०१९ मध्ये या कारखान्यांमधून चाळीस खटले दाखल झाले. तर २०२० मध्ये २३, २०२१ मध्ये ३९ असे खटले औद्योगिक कंपन्यांमधून वेगवेगळ्या घटनांमध्ये दाखल झाले तर २०१९ मध्ये २७ तक्रारी २०२० मध्ये १३, २०२१ मध्ये १६ एवढ्या तक्रारी प्राप्त झाल्या मात्र सर्वच्या सर्व तक्रारी निकाली निघाल्याचे उघड झाले आहे. याबाबत कोण कुठलाही कारखानदार दोषी नसल्याचे समजते.
औद्योगिक वसाहतीमधील कामगारांचे शोषण हेच पुढार्यांआचे हीत?
रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या औद्योगिक वसाहतीमधील धोकादायक कारखान्यांमधून काम करणारा कामगार वर्ग हा बहुतांशी कंत्राटी वर्ग आहे. वेगवेगळ्या पुढाऱ्यांची मुले व त्यांचे हस्तक अनेक कंपन्यांमधून कंत्राटी पद्धतीने कामगार वर्ग कंपनी व्यवस्थापनाला पुरवीत असतात अल्प वेतनावर काम करून घेण्यात कामगार मिळत असल्याने कंपनी व्यवस्थापन मोठ्या प्रमाणात कंत्राटी पद्धतीने कामगार कंपनीमध्ये राबवित आहे त्यामुळे कामगार वर्गाचे मोठ्या प्रमाणावर शोषण होत आहे या कंत्राटी कामगारांना कोणतेही प्रशिक्षण न देता त्यांना धोकादायक ठिकाणी कामावर नेमण्यात येते. त्यामुळे अनुभव नसलेले अनेक कामगार कंपनीत होणार या घटनेला जबाबदार ठरतात एखाद्या वेळी मोठी घटना घडली की मग त्या कामगाराला थोड्याफार प्रमाणात आर्थिक मदत करून परस्पर या प्रकरणाची विल्हेवाट लावली जाते याबाबत कोणताही गुन्हा दाखल न झाल्याने औद्योगिक विकास महामंडळ व औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय कोणतीही कारवाई कंपनीवर करू शकत नाही.
रायगड जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील धोकादायक कंपन्यांमधून काम करणाऱ्या कंत्राटी कामगार वर्गाची पिळवणूक करून राजकीय पुढारी व कंपनी व्यवस्थापन आप आपला फायदा करून घेत आहेत तर कंपनीला फायदा करण्याच्या बदल्यांमध्ये हेच पुढारी कंपन्यांकडून सीएसआर फंडाच्या नावाखाली गावोगावी विकास करण्याच्या गोंडस नावाखाली मतदारांना भुलवण्यासाठी सीएसआर फंडाचा उपयोग केला जात आहे. यामध्ये कंपनी व्यवस्थापन स्वतःचे हित जपणारा बरोबर पुढाऱ्यांचे हीदेखील जपत आहे. मात्र कंत्राटी कामगारांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा उद्योग रायगड जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहे. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या अंदाज समितीने रायगड जिल्ह्याचा पाहणी दौरा केला त्यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यामध्ये या धोकादायक कंपन्यांची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.