सफाई कर्मचारी व गल्लोगल्ली फिरणारी गाडी…

सौ.संगीता संतोष ठलाल 

मु.कुरखेडा जि.गडचिरोली 

मो: ७८२१८१६४८५

“गाडी वाला आया घरसे कचरा निकाल” हे गीत सकाळी, सकाळी दररोज आपल्याला ऐकायला मिळत असते आणि ऐकून सुद्धा बरं वाटत असतं कारण, दररोज हे गीत ऐकण्याची आपल्याला सवय झालेली आहे. काही का असेना पण, निदान कोणीतरी आपली भेट घेण्यासाठी सकाळी, सकाळी गल्लीतून गाणं म्हणत फेरी मारत असतो असंच वाटत असतं. म्हणून आपलं घर व आपला परिसर सुद्धा स्वच्छ करुन जातो व स्वच्छतेचा संदेश देऊन जातो. कारण या गीतामधून कुठेतरी संदेश मिळत असतो एखाद्या दिवशी हि गाडी गल्लीत आली नाही की,सुनं वाटतो अशी हि कचरा वाहून नेणारी घंटागाडी आहे. ती,सर्वांना आपल्या गीताच्या माध्यमातून घरासमोर बादलीत कचरा गोळा करुन उभी रहायला सांगते.यासाठी खरोखरच शासनाचे धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहे अतिशय सुंदर कार्य केले आहेत.व कचरा गोळा करण्यासाठी चांगली सोय केलेली आहे. 

     गेल्या दोन वर्षांच्या आधी कचरा गोळा करुन नेणारी गाडी वेगळी होती कारण, ती गाडी सफाई कर्मचारी बंधूना स्वतः चालवावी लागत होती व कचरा जास्त झाला की, कधी,कधी ते पायी, पायी चालून गाडी गल्लोगल्ली फिरवत होते आपण बघितले असणार. . कधी, कधी सफाई कर्मचाऱ्यांना जेवण करायला कदाचित दोन वाजत असतील. ..या समाजात राहणाऱ्या लोकांना कदाचित माहीत नसणार. ..मागे एकदा सफाई कर्मचारी बंधू माझ्या गल्ली त कचरा गोळा करायला आले होते तेव्हा, याच विषयावर मी थोडक्यात का होईना त्यांच्याशी संवाद साधण्याची इच्छा केली स तेव्हा त्यांनी मला सांगितले की, ताई गल्लोगल्लीत जाऊन कचरा गोळा करतांना कधी वेळ निघून जातो ते कळतच नाही. या समाजात राहणाऱ्या लोकांना कदाचित माहीत नसेल. ..जर वेळेचे भान राहिले असते तर आपुलकीने आम्हाला विचारले असते पण, आम्हाला कोणीही विचारत नाही. असो,हे आमचे दैनदिन काम आहे पण, उशीरा का होईना शासनाने कचरा गाडीची व्यवस्था वेगळ्या प्रकारे केल्यामुळे आधीच्या कचरा गाडीपासून थोडासा का होईना त्या त्रासापासून सुटका झाली. 

      दररोज आपल्या मोहल्यात किंवा शहरभर फिरत असणारी ही घंटागाडी जेव्हा,जेव्हा येते तेव्हा सर्वजण इकडे, तिकडे कचरा कुठे आहे का म्हणून काळजीने शोधायला लागत असतात मग तो कचरा गोळा करुन ओला कचरा, सुका कचरा लिहिलेल्या डब्ब्यात टाकतात आज याच कचरा जमा करणाऱ्या गाडीमुळेच कुठेही आसपास कचरा पडलेला दिसून येत नाही. गाडीतून जे गीत दररोज आपल्याला ऐकायला मिळते ते गाणं लहान मुलांपासून ते वृधांना सुध्दा मुखपाठ झालेला आहे. या कचरा गाडीशी एक प्रकारचा नाताच जुळून आलेला आहे की,काय म्हणायला काहीच हरकत नाही. अशी ही घंटागाडी सर्वांना आपलीशी करुन दररोज गल्लोगल्लीत भेट देत असते. प्रत्येक जण तीची आतुरतेने वाट बघत असतात व कचरा गोळा करुन अंगणासमोर उभे राहतात. अशी ही घंटागाडी आहे. कचरा गोळा करुन नेणारी व सुंदर गाणे ऐकवुन आपलेसे करणारी ही घंटागाडी अशीच दररोज फिरत रहावी तिच्यामुळे स्वच्छता दिसेल व सर्वजण निरोगी राहतील. ..यात सफाई कर्मचाऱ्यांचा सुद्धा आपण सर्वांनी सन्मान करायला पाहिजे व त्यांच्याप्रती आपुलकी ठेवायला पाहिजे कारण ते सुद्धा माणसेच आहेत दररोज कचरा गोळा करुन जगत असतात आणि प्रामाणिकपणे आपले काम करत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here