नगरसेवकांनी जर संचालकांकडे अपील केली असती, तर घर टॅक्स वाढला नसता
नगर विकास संघर्ष समितीच्या पुढाकाराने , उच्च न्यायालयात रीट पिटेसन याचीका दाखल
✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱मो.नं.9373472847📞
भंडारा : मोहाडी नगर पंचायत आपल्या मनमानी कारभारामुळे नेहमीं चर्चेत असते. घर टॅक्सची वाढ मान्य आहे. पण एवढी आतोनात वाढ जे पाच, दहा पटीने कऱण्यात आली ती वाढ सामान्य नागरिक कशी काय खपवून घेणार? जिथे कोणतेही कारखाने नाही, बेरोजगारांना रोजगार नाही, मोठें व्यवसाय नाही. त्या ठिकाणी शिक्षण कर, रोजगार हमी कर, अग्निषमक कर लावून जनतेला सर्रास लुटण्याचा प्रकार नगर पंचायत करीत आहे. ज्या ठिकाणी पिण्याचा पाण्याची नेहमी टंचाई भासते त्याचे नियोजन नाही. फक्त घर टॅक्स वसुली करीता धमकविने सुरू आहे. नगर विकास संघर्ष समितीने वेळोवेळी निवेदने दीले, भव्य जनआक्रोश मोर्चा नगर पंचायत वर काढण्यात आला. तेव्हा जनतेच्या रोष पाहून नगराध्यक्षा मॅडम यांनी तात्पुरती स्थगिती दिली. पण पैसे कमावण्याचा नादात मुख्याधिकारी यांनी आपल्या हिटलरशाहीचा परिचय देत मां.जिल्हाधिकारी साहेब यांची दिशाभूल करून घर टॅक्स वाढविण्याबाबत अर्ज केले. व सर्व नगरसेवकांनी मुक संमती दिली.
नगर विकास संघर्ष समितीने नगर पंचायत नगराध्यक्ष मॅडमला निवेदन देवून प्रादेशिक संचालक नगर परिषद प्रशासन विभाग नागपूर यांच्याकडे अपील दाखल करण्यात यावे म्हणून वारंवार निवेदने दीले. पण याची साधी दखल सुध्दा घेण्यात आली नाही. व अखेर घर टॅक्स जैसे थे तैसाच राहिला. नियमाप्रमाणे सामान्य नागरिक सरळ प्रादेशिक संचालकांकडे अपील दाखल करू शकत नाही. मुख्याधिकारीच्या हिटलर शाही वृत्तीमुळे व नगरसेवकांचा लालची खाऊ वृत्तीमुळे मोहाडी नगर वासियावर कराचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागत आहे. नगर पंचायतनी अपील दाखल केली असती तर ही वेळ मोहाडी नगरवासियावर आली नसती ? अखेर नगर विकास संघर्ष समिती मोहाडी ने लोक वर्गणी गोळा करून उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे रीट पिटेसन याचिका दाखल करण्यात आली. व मां.उच्च न्यायालयाने सुनावणी घेऊन तातडीने प्रादेशिक संचालक नगर परिषद प्रशासन नागपूर विभाग यांना जलद गतीने निकाल देण्याचे आदेश जारी केले.
कर बाबतची याचिका प्रादेशिक संचालक नगर परिषद प्रशासन नागपूर विभाग यांचा कडे लवकरच सुरू होणार असून निर्णय मोहाडी नगर वासियांचा बाजूने लागावे म्हणून नगर विकास संघर्ष समिती ने योग्य कागदपत्रे व २ वेळा मोजणी करून ४४ लक्ष अठ्ठावीस हजार सहाशे रुपये ज्या फोर जी कंपनीला दिले त्यांचे पुरावे व प्रत्यक्षात ज्यांची मोजनीच कऱण्यात आली नाही. अश्या नागरीकांना अंदाजे अमाप शमाप घर टॅक्स वाढवून देण्यात आले त्याचे पुरावे सर्व गोळा कऱण्यात आले असून प्रादेशिक संचालक नगर प्रशासन नागपूर विभाग यांना सादर करण्यात येणार आहेत. असे नगर विकास संघर्ष समिती ने एका पत्राद्वारे कळविले आहे.
पण या घर टॅक्स वाढी बाबत सर्व नगरसेवक अध्यक्ष,उपाध्यक्ष जबाबदार आहेत असे नगर विकास संघर्ष समितीचे ठाम मत असुन हे लवकरच उघड होणार आहेत. भ्रष्टाचार करण्यात आघाडीवर असणाऱ्या मुख्याधिकारी व नगरसेवकांना मोहाडीवासी कदापी माफ करणार नाही. असे खुशाल कोसरे, बबलू सैय्यद, पुरूषोत्तम पात्रे, अनिल न्यायखोर, श्याम चौधरी, आदर्श बडवाइक यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे या कडे मोहाडी शहरातील नागरिकांचे विशेष लक्ष लागलेले आहे.