आदिवासी महिला तब्बल ३० फूट उंचीवरील झाडावर चढली; पोटासाठी
✒️संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞९०१११९९३३३
नेरळ :- कोल्हारे येथे त्रिवेणी संगमावर श्री क्षेत्र संगमेश्वर शिव मंदिर आहे.त्या ठिकाणी भक्त दर्शनासाठी येत असतात आणि भक्तांनी शिवलिंगावर वाहण्यासाठी बेलाची पाने खरेदी करावीत.म्हणून तेथील आदिवासी महिला बेलाची पाने गोळा करण्यासाठी तब्बल ३० फूट उंचीवर चढल्या होत्या. ते कशासाठी तर पोटासाठी.. दोन पैसे कमविण्यासाठी असा जीवघेणा प्रयत्न पाहताना अनेकांच्या पोटात गोळा आला होता.
कोल्हारे येथे उल्हास नदी येथे त्रिवेणी संगमावर शिव मंदिर आहे.ते शिव मंदिर पांडव कालीन असल्याने त्या ठिकाणी असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी आणि भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी शिव भक्त गर्दी करीत असतात. सोमवारी प्रामुख्याने शिव भक्त गर्दी करीत असतात आणि त्यांच्यासाठी बेलाची पाने महत्वाची असतात.ती बेलाची पाने सध्या पानझडी मुळे दुर्मिळ झाली असून नवीन पालवी फुटण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे बेलासोबत अनेक झाडांची पाने कमी झाली आहेत.मात्र भगवान शंकराचे भक्त यांच्यासाठी बेलाची पाने महत्वाची असतात.ही बेलाची पाने ज्या बेलाच्य झाडाला मिळतात,त्या झाडाला मोठ्या प्रमाणात काटे असतात आणि त्यामुळे या झाडावर फांद्या वरील काटे चुकवत आदिवासी लोक झाडावर चढतात आणि बेलाची पाने काढली जातात.
कोल्हारे येथील श्री क्षेत्र संगमेश्वर परिसरात एकमेव बेलाचे झाड आहे.त्या झाडाची उंची साधारण ४०फूट एवढी असून त्या झाडावर अगदी टोकाला पाने आहेत.जमिनीपासून किमान २५ फूट उंचीपर्यंत झाडाला पाने नसल्याने एक आदिवासी महिला त्या बेलाच्या झाडावर पाने नव्हती.त्यामुळे बेलाची पाने काढण्यासाठी चढलेली आदिवासी महिला या झाडावर तब्बल ३०-३५ फूट चढून पाने काढताना दिसत होत्या.बेलाच्या झाडाला मोठ्या प्रमाणात झाडाच्या खोडाला आणि फांद्या यांना काटे असतात.त्या काट्यांची लांबी ही दोन ते तीन इंच लांबीचे असतात.त्यामुळे ते काटे चुकवीत ही महिला बेलाच्या झाडावर अगदी तुरळक असलेली पाने असताना ती पाने काढताना त्या आदिवासी महिलेची कसरत प्रंचड जिद्द दाखविणारी होती.त्या आदिवासी महिलेची ती बेलाची झाडावर चढून पाने काढण्याची कसरत ही कशासाठी आहे तर पोटासाठी आणि दोन पैसे कमविण्यासाठी आहे असे स्पष्ट झाले आहे.
कोल्हारे कातकरी वाडी मधील ती आदिवासी महिला तब्बल एक तासाने काटे चुकवत आणि तोचलेलेले यामुळे आलेले रक्त पुसत झाडाखाली आल्या. त्यावेळी मंदिरात दर्शनासाठी आलेले भक्त यांनी एवढ्या उंचीवर चढण्याची गरज काय? असा प्रश्न केला असता त्या महिलेने पोटावर हात फिरवत झाडावरून काढलेली बेलाची पाने ही विक्रीसाठी मांडू लागली.काहीसे चित्त थरारक असे चित्र ती महिला झाडावर चढलेली असताना शिव मंदिरात आलेले भक्त पाहत होते.