शहरात काँग्रेस तर ग्रामीण भागात भा. ज. पा . चा वर्चस्व कायम.

शहरात काँग्रेस तर ग्रामीण भागात भा. ज. पा . चा वर्चस्व कायम.

शहरात काँग्रेस तर ग्रामीण भागात भा. ज. पा . चा वर्चस्व कायम.

शहरात काँग्रेस तर ग्रामीण भागात भा. ज. पा . चा वर्चस्व कायम.

प्रवीण शेंडे. जिल्हा प्रतिनिधी.
मो.9834486558

गोंदिया – भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत 18 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत पण मुख्य लडाई (मुकाबला ) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (महाविकास आघाडी )आणि भारतीय जनता पक्षात (महायुतीत )असल्याचा चित्र पाहाव्यास मिळत आहे. महाविकास आघाडी कडून काँग्रेस चे उमेदवार डॉ. प्रशांत यादोराव पडोळे रिंगणात आहेत तर महायुती कडून माजी खासदार सुनील मेंढे पुन्हा यांनी कंबर कसली आहे. दोन्ही उमेदवाराच्या पाठीशी मोठं मोठया नेत्याचा पाठबड असल्याचा जाणवत आहेत. महायुती कडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रफुल पटेल, भारतीय जनता पक्षाचे परिणय फुके या दोन्ही नेत्याचा दोन्ही जिल्ह्यात वर्चस्व आहे, तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे नाना भाऊ पटोले यांना मानणारा मोठा वर्ग दोन्ही जिल्ह्यात असल्यामुळे हीं लोकसभेची लढाई मोठया चूर्षीची होण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.मीडिया वार्ता न्यूज च्या जिल्हा प्रतिनिधी ने तिरोडा विधान सभा क्षेत्रात केलेल्या सर्वे मध्ये असे समजले आहे की तिरोडा शहरात पारंपारिक मतदानात राष्ट्रवादी समोर राहत असे तर भारतीय जनता पक्ष ग्रामीण भागात अग्रसर असायचे पण या निवडणुकीत काँग्रेस पक्ष 25 वर्षा नंतर पंजा चिन्हवर निवडणूक लडवीत असल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते जोमाने प्रचाराला लागले आहेत, शहरात राष्ट्रवादीला मिळणारे मत आता काँग्रेस पक्षाकळे वळण्याची शक्यता दिसत आहे पण ग्रामीण भागात असलेला भारतीय जनता पक्षा चा मत कितपत काँग्रेस चे ग्रामीण चे नेते आपल्या पक्षाकळे वळविण्यात यशस्वी होतात ते महत्व पूर्ण आहे. तिरोडा विधानसभा क्षेत्र हा भारतीय जनता पक्षाचा क्षेत्र मानला जातो. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात एकमेव भारतीय जनता पक्षाचा आमदार असल्यामुळे त्यांना सुद्धा आपला गढ राखण्यात कितपत यश येतो हे पाहण्याजोगे आहे. आज च्या केलेल्या सर्वे मध्ये तिरोडा तालुक्यात ग्रामीण भागात भारतीय जनता पक्षाचा वर्चस्व पाहाव्यास मिळत आहे.आता हीं लढाई नानाभाऊ पटोले विरुद्ध प्रफुल पटेल अशी झाली असल्यामुळे दोन्ही जिल्ह्याचे महाविकास आघाडी चे आणि महायुतीचे कार्यकर्ते खिंडर भरून काढण्याच्या प्रयत्नात आहेत,पण मतदाते पाहिजे तितके प्रतिसाद देत नसल्यामुळे दोन्ही चिंतेचे वातावरण पाहाव्यास मिळत आहेत. दोन्ही पक्षाचे उमेदवार, नेते, आणि कार्यकर्ते घरो घरी जाऊन मत मागीत आहेत.