बीड जिल्ह्यात 3 दिवसाचा कडक लॉकडाऊन, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांचे आदेश.
बीड जिल्ह्यात 3 दिवसाचा कडक लॉकडाऊन, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांचे आदेश.

बीड जिल्ह्यात 3 दिवसाचा कडक लॉकडाऊन, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांचे आदेश.

बीड जिल्ह्यात 3 दिवसाचा कडक लॉकडाऊन, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांचे आदेश.
बीड जिल्ह्यात 3 दिवसाचा कडक लॉकडाऊन, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांचे आदेश.

✒प्रा. श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी✒
बीड:- जिल्हात मोठ्या प्रमाणात वाढता कोरोना वायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेल्या रविंद्र जगताप, जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, बीड यांचा अधिकारानुसार तसेच फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये मला प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून कोविड-19 विषाणूचा संसर्ग रोखण्याकरीता खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात आला आहे.

1. बुधवार, गुरुवार व शुक्रवार (दिनांक 05/05/2021 व 07/05/2021) या दिवशी केवळ खालील आस्थापना पुर्णवेळ सुरु राहतील. सर्व औषधालये (Medical), दवाखाने, निदान क्लिनीक, लसीकरण केंद्रे, वैद्यकिय विमा कार्यालये, फार्मास्युटिकल्स, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकिय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स, वाहतुक आणि पुरवठा साखळी, लसींचे उत्पादन व वितरण, सॅनिटायझर्स, मास्क, वैद्यकिय उपकरणे, कच्चा माल युनिट आणि सहाय्य सेवा, पेट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने, टपाल सेवा इ. उपरोक्त अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना वगळता इतर कोणत्याही आस्थापना उपरोक्त दिवशी चालू राहणार नाहीत.

2. दुध विक्री केवळ प्रत्येक दिवशी सकाळी 7.00 ते 11.00 वाजेपर्यंत सुरु राहील .

3. गॅस वितरण दिवसभर सुरु राहील .

4. बँकेचे कामकाज प्रत्येक दिवशी सकाळी 10.00 ते दु. 12.00 वाजेपर्यंत अंतर्गत कामकाजासाठी व शासकीय व्यवहारासाठी सुरु राहील.

5. शनिवार व रविवार रोजी (दिनांक 08/05/2021 व 09/05/2021) जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना ( किराणा दुकाने , भाजीपाला , फळविक्री , चिकन , मटन विक्रीचे दुकाने, बेकरी व कृषीशी संबंधित इ.) केवळ 7.00 ते 11.00 या वेळेत चालू राहतील .

6. तसेच शनिवार व रविवार रोजी (दिनांक 08/05/2021 व 09/05/2021) केवळ हातगाड्यावर फिरुन फळांची विक्री सायकांळी 5.00 ते रात्री 7.00 या वेळेत करता येईल .

 सदरच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील. उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here