कळमेश्वर तालुक्यातील शेतकरी शेतीच्या मशागती व्यस्त. मात्र कोरोनामुळे फटका.

59

कळमेश्वर तालुक्यातील शेतकरी शेतीच्या मशागती व्यस्त. मात्र कोरोनामुळे फटका.

कळमेश्वर तालुक्यातील शेतकरी शेतीच्या मशागती व्यस्त. मात्र कोरोनामुळे फटका.
कळमेश्वर तालुक्यातील शेतकरी शेतीच्या मशागती व्यस्त. मात्र कोरोनामुळे फटका.

✒युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
कळमेश्वर:- पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपल्याने कळमेश्वर तालुक्यातील शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. एकीकडे कोरोना वायरस मोठ्या प्रमाणात वाढला असला तरी पावसाळा काही दिवसावर झाल्याने शेतीची कामे कशी करावी या विवंचनेत शेतकरी अडकलेल्या आहेत. शेतकऱ्यांची स्वताःची पर्वा न करता शेतीच्या कामात शेतमजूर आणि शेतकरी गुंतून गेलेला आहे. शेतातील काडीकचरा तुरीचे फण व गव्हाचे उभे असलेले झाडे पेटविण्यात शेतकरी व्यस्त झाला आहे. या वर्षी शेतीची मशागत करत असताना शेतमजुराच्या मजुरीचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. एकीकडे कोरोना वायरचे आगमन अधिक असल्याने काही शेतमजूर घरांच्या बाहेरच पडत नसल्यामुळे अधिक मजुरी देऊन त्यांच्याकडून शेतीची कामे करून घ्यावी लागत असल्याचे शेतकऱ्यांनी या वेळी सांगितले.

मागील वर्षी शेतकऱ्यांच्या मशागतीसाठी जो खर्च लागत होता त्या खर्चात आता मात्र दुपटीने वाढ झाल्याचे मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांमध्ये या प्रकारचे सूर उमटत आहे. एक एकर शेती तयार करण्यासाठी नांगरणे, वखरणे अल्पप्रमाणात होती. यावर्षी मात्र सर्व शेतीची मशागत यंत्रांच्या साह्याने करावी लागत असल्याने ट्रॅक्टर भाड्याने भाड्याचे दर वाढलेले आहे. कारण डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने परिणाम मालकांनी आपल्या ट्रॅक्टरचे अधिक दर वाढल्याने त्यामुळे शेती तयार करणे ही शेतकऱ्यांसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणाम अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदी केले परंतु आपल्या घरी बैलजोडी मात्र शेतकऱ्याने विकून टाकल्याने शेती आता यंत्राच्या साह्याने करावी लागत आहे. असे मानले तर या यंत्राचे दर शेतकऱ्यांना परवडणारे नसल्याचे बोलले जात आहे.

दरवर्षी होणाऱ्या नापिकीमुळे व शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने यावर्षी शेत लागवणीला देणे जरी जोरात असले तरी येणाऱ्या व्यक्ती संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत लागवणीला यावर्षी कमी भावाने लागवणीवर शेत देण्यास शेतकरी तयार झाला आहे. सतत निसर्गाची साथ शेतकऱ्यांना लाभत नसल्यामुळे यावर्षीही शेतात पेरणी कशी करावी या विवंचनेत शेतकरी आहे. रबी हंगामसुद्धा आता संपला असल्याने पुढील पेरणीसाठी तालुक्यातील बळीराजा पुन्हा सज्ज झाला आहे.