माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांची कोविड सेंटरला भेट
माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांची कोविड सेंटरला भेट

माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांची कोविड सेंटरला भेट

जैन श्वेतांबर मंडळाचे व्यवस्थापक व वैद्यकीय अधिकारींचा सत्कार

माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांची कोविड सेंटरला भेट
माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांची कोविड सेंटरला भेट

✒️मनोज खोब्रागडे✒️
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर (भद्रावती) :- कोविड-१९ च्या पहिल्या लाटेपासून जैन मन्दिर हे जिल्ह्यातील पहिले देवस्थान आहे, ज्यांनी कोविड सेंटर साठी सुसज्ज बेडयुक्त जागा उपलब्ध करुन प्रशासनाला चालवण्याकरीता दिली. जैन श्वेतांबर मंडळातर्फे सदर सुसज्ज कोविड सेंटर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून मागील वर्षीपासून चालविण्यात येत आहे. अनेक कोविडबाधित रूग्णांना या सेंटरचा लाभ होत आहे.

स्थानिक जैन मन्दिर येथील कोविड सेंटरला माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी आज (दि.9) ला भेट दिली व कोविड सेंटरची पाहणी केली. यावेळी जैन श्वेतांबर मंडळाचे व्यवस्थापक भीकमचंद बोरा (बाबुजी) व प्रकाशजी कोठारी तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. नितिन सातभाई यांचा सत्कार माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी केला.

यावेळी बोलतांना हंसराज अहिर यांनी सान्गितले की, जिल्ह्यातील एक सुव्यवस्थित कोविड सेंटर म्हणुन हे सेंटर नावारुपास आले आहे व इच्छा व्यक्त केली की, या देवस्थान मंडळाप्रमाणे इतरही देवस्थान मंडळांनी अशाप्रकारे कोविड सेंटर सुरु करावे, व रूग्णांकरीता सुसज्ज सुविधायुक्त रुग्णालय उभारावे.असे आव्हाहन यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here