Ph.D. विद्यार्थ्यांच्या पणतीत केव्हा वाती पेटणार?

✒प्रा. अक्षय पेटकर✒
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
रात्रंदिवस अभ्यास करून आम्ही Ph.D. पर्यंत आलो पण सरकार आणि ओबीसी मंत्री वडेट्टीवार यांनी कोरोनाच कारण देऊन आमचं घोंगड गेल्या दोन वर्षापासून असच भिजत ठेवलंय. इथं गरीब ९०% मूल ही शेतकरी कुटुंबातील असून आई बाप पोटाला चिमटा काढून आपल्या पोराला शिकवत आहेत अशातच कोरोना काळात देखील परीक्षा फी आकारून आमची अडवणूक करत आचार्य पदवीधरांवर अन्याय होत आहे. वाढत चालेल वय, बाहेरच्या जगतात मांडलेला नोकरीचा धंदा, अपेक्षांचं ओझं यात आचार्य पदवीधर दबला जात आहे. त्यातच परत नोंदणीचे वय, अतिशय कमी शुल्क व १५० जागांची निवड अश्या महाज्योतीच्या काळ्या नियमांमध्ये असलेल्या त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणास मुकावे लागणार आहे. हा विद्यार्थ्यांवर अन्याय नेमका कशासाठी? शिष्यवृतीमधील प्रश्न सोडवन्यासाठी विद्यार्थी हा या राष्ट्राचा केद्रबिंदू म्हणून ओबीसी मंत्री वडेट्टीवार याकडे केव्हा बघणार?
सचिन धारे, आचार्य पदवी धारक विद्यार्थी व.ना.म कृ.वि. परभणी.