क्राईस्ट रुग्णालयातील डॉक्टर जावेद सिद्दीकी यांना पोलीसांनी केली अटक.
डॉ.झाडे व डॉ.गुलवाडे यांच्या कोविड सेंटरवर सुद्धा कारवाई होण्याचे संकेत?
✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की,कोरोनाच्या काळात काही डॉक्टर्स लोकांना संधी असून त्यांनी या संधीचा फायदा घेत पैसे कमाविण्याच्या नादात आपल्या सेवेचे बाजारीकरण चालवले आहे. यात चंद्रपूर शहरात रेमडीसीविर इंजेक्शनच्या तुटवडा दाखवून स्वतः डॉक्टर्स या इंजेक्शन चा काळाबाजार जिल्ह्यात करीत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून शहरातील क्राईस्ट रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचे प्रभारी डॉक्टर जावेद सिद्दीकी यांना रेमडेसिविर इंजेक्शन च्या काळाबाजाराप्रकरणी रात्री अटक करण्यात आली आहे.
रेमडेसिविर इंजेक्शन च्या क्राईस्ट रुग्णालयातील या गैरप्रकारात डॉक्टरला मदत करणाऱ्या 2 नर्सेसला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी रात्री अन्न व औषध प्रशासन पथकाने एका गुप्त माहितीच्या आधारे गांधी चौक या गजबजलेल्या भागात रेमडेसिव्हीर विक्रेता आणि खरेदीदार या दोघांना धाड घालून ताब्यात घेतले होते. गुन्हा नोंद करून हा तपास शहर पोलिस ठाण्याला सोपविण्यात आला होता. पोलीसांनी या काळाबाजाराप्रकरणी अधिक तपास जोरात चालवला आहे.