रचना ढोकपांडेच्या कार्याच सर्वीकडून कौतुक.

55

रचना ढोकपांडेच्या कार्याच सर्वीकडून कौतुक.

रचना ढोकपांडेच्या कार्याच सर्वीकडून कौतुक.
रचना ढोकपांडेच्या कार्याच सर्वीकडून कौतुक.

✒️प्रशांत जगताप, प्रतिनिधी✒️
हिंगणघाट,दि.09मे:- सध्या राज्यात आणि जिल्हा कोरोना वायरसचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. आरोग्य यंत्रणेनेवर मोठ्या प्रमाणात तान पडत आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सेवा देण्यात यावी या शासनाच्या आदेशानुसार वर्धा बोरगाव मेघे येथील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अंड रिसर्च येथील विद्यार्थी रचना दशरथ ढोकपांडे हि अरिहंत मेडिकल औषध वितरण करणाऱ्या दुकानात निशुल्क सेवा देत आहे.

रचना दशरथ ढोकपांडे ही विद्यार्थिनी मागील चार वर्षापासून वर्धा येथील फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून कोरोना चा संसर्ग वाढत असल्याने आपल्याकडून थोडीफार मदत शासनाला देण्यात यावी या उद्देशाने या विद्यार्थिनीने मागील एक महिन्यापासून अरिहंत मेडिकल स्टोअर्स मध्ये निशुल्क औषध दुकानांमध्ये सेवा देत आहेत. तिचे या सेवा कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.