ग्रामीण रुग्णालय सिंदेवाहि हे गंभीर समस्याच्या विळख्यात. अधिकारी व कर्मचारी यांच्यात नियमितता आणि समन्वयाचा अभाव.
ग्रामीण रुग्णालय सिंदेवाहि हे गंभीर समस्याच्या विळख्यात. अधिकारी व कर्मचारी यांच्यात नियमितता आणि समन्वयाचा अभाव.

ग्रामीण रुग्णालय सिंदेवाहि हे गंभीर समस्याच्या विळख्यात. अधिकारी व कर्मचारी यांच्यात नियमितता आणि समन्वयाचा अभाव.

ग्रामीण रुग्णालय सिंदेवाहि हे गंभीर समस्याच्या विळख्यात. अधिकारी व कर्मचारी यांच्यात नियमितता आणि समन्वयाचा अभाव.
ग्रामीण रुग्णालय सिंदेवाहि हे गंभीर समस्याच्या विळख्यात. अधिकारी व कर्मचारी यांच्यात नियमितता आणि समन्वयाचा अभाव.

मुकेश शेंडे, सिंदेवाही तालुका प्रतिनिधि 
सिंदेवाही:एकीकडे संपूर्ण देशात कोव्हीड-19 च्या प्रादुर्भावाने समाज त्रस्त असताना दुसरीकडे गोरगरीब, मध्यमवर्गीय कुटुंबाचा आधार म्हणून सामान्य नागरिक आणि समाज ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य सुविधेकड़े पाहतोय परंतु मागील काही वर्षापासुन ग्रामीण रुग्णालय सिंदेवाहि यांच्या समस्या संपता संपेना कधी डाक्टरांचा अभाव, कधी फार्मासिस्ट, कधी टेक्नीशियन, कधी तपासनिस, कधी परीचारिका, सफाई कर्मचारी, इत्यादि पूर्णतः नानाविध गंभीरात-गंभीर समस्यांनि ग्रामीण रुग्णालय सिंदेवाहि ग्रस्त आहे. त्यातच कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासुन तर एकंदरित या रुग्णालयात कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी याना एक प्रकारे रान मोकळे झाले आल्याचे निदर्शनास आले आहे.

करोड़ो रूपये निधि खर्च करुण इमारतीचे नुतानिकरण करण्यात आले परंतु ग्रामीण रुणालयातील कत्राटी कर्मचारिनि त्याचा वापर सर्रास पने गोडाउन म्हणून आणि स्वतःच वाहन व्यवस्था तसेच मोकाट जनावरे जसे कुत्री, मांजर, बैल, डूक्कर यांच्या करिता लावारिस बेवारस सोडून दिले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुद्धा पूर्णपने या गंभीर बाबिकड़े दुर्लक्ष आहे. फायलेरिया, फवारणी, महिला तपासनि, क्षयरोग, एड्स, इत्यादि विभाग नदारद झाले आहेत. त्यातच अद्द्यावत तंत्र असलेली नवीन एक्सरे मशीन शासनाने उपलब्ध करुण देवून सुद्धा टेक्नीशियन कायमच नदारद असतात. अटेंडन्स हे डाक्टरच्या खुर्ची वर बसून स्वतःच वैद्यकीय अधीक्षक असल्याचे नागरिकांना भासवून तसेच कोव्हीडची भीति दाखवून रुग्णाना पळवून लावण्यात धन्यता मानतात. इत्यादि सर्व समस्यानचा सात्यत्याने वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी यांचे कड़े सुद्धा पाठपुरावा युनुसभाई शेख प्रतिनिधि रुग्ण कल्याण समिति तथा नगरसेवक यांचे द्वारे होत असून सुद्धा त्याना आम्ही आरोग्य विभागातील कार्यरत आहोत अश्या परिस्थितित कार्यवाही आणि कायदा याचा आधार घेत मनमानी कारभार सुरु आहे. प्रत्यक्ष दखल घेवून सुद्धा ग्रामीण रुग्णालय सिंदेवाहि येथील साधा कंट्राती कामगार असो की कर्मचारी सर्व निढाळ झाले आहेत. काही बोटावर मोजन्या सारखे डॉक्टर आणि काही वरिष्ठ कर्मचारी सोडले तर नव्याने रुजू झालेले नवनियुक्त कर्मचारी जरा जास्तच माज चढल्याचे दिसून येत आहे. सुरक्षा गार्ड आणि सफाई कामगार कधीच आपल्या ड्रेसकोड मध्ये उपस्थित राहत नाही. ग्रामीण रुग्णालय सिंदेवाहि येथे अनुशासनाचा मोठा अभाव आहे. आणि तो मागील काही वर्षापासुन जरा जास्तच वाढलेला आहे. कुणाला काही बोलण्याची मुभा नाही. कारण वरिष्ठ अधिकारिनीच या कनिष्ठ कर्मचारी आणि कामगाराना सूट दिली आल्याचे प्रत्यक्ष पाहणी आणि अनुभवातून दिसून येत आहे.

कितीतरी गंभीर प्रकार ग्रामीण रुग्णालय सिंदेवाहि येथे सुरु आहेत तात्काळ याकडे सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि सन्माननीय जिल्हाशल्य चिकित्सक साहेबांनी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाहिच्या या गंभीर समस्यानकडे दखल घेवून लक्ष पुरवावे अशी विनंती करित असल्याचे सांगितले आहे. अन्यतः ग्रामीण रुग्णालय सिंदेवाहि विषयी कायद्याने आंदोलन करुण वेळप्रसंगी रुगनांच्या सोई-सुविधे करिता व्यक्तिक मोठा निर्णय सुद्धा घेणार असा इशारा युनुसभाई शेख प्रतिनिधि रुग्नकल्याण समिति तथा नगरसेवक न.प. सिंदेवाहि यानी आजच्या या बातमीपत्राद्वारे दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here