एटापल्ली येतील राजेश बसवेश्वर हजारे यांना राज्यस्तरीय कोविड योद्धा समाजरक्षक महासन्मान पुरस्कार जाहीर.
मारोती कांबळे
एटापल्ली तालुका प्रतिनिधी
एटापल्ली:- येथील राजेश हजारे याला राज्यस्तरीय कोविड योद्धा समाजरक्षक पुरस्कार प्राप्त झालं. त्यामध्ये राजेश बसवेश्वर हजारे यांना अखिल महाराष्ट्र पत्रकार आणि पत्रलेखक संघाकडून हा पुरस्कार घोषित करण्यात आला. त्यांनी कोरोना काळात केलेल्या विविध कार्याची दखल घेत अखिल महाराष्ट्र पत्रकार आणि पत्रलेखक संघाने हा पुरस्कार राजेश बसवेश्वर हजारे यांना देण्याचे ठरविले.
राजेश हजारे यांनी असे म्हटले की मी नेहमी समाजसेवा करण्यास तयार असणार आणि हा सन्मान नाही तर हा तुमचा आशीर्वाद व माझावर असणारा प्रेम आहे. नेहमी आपलं असाच आशीर्वाद व प्रेम माझा पाठीशी असूद्या ही अपेक्षा. त्यांनी या पुरस्काराचा श्रेय त्यांचे वडील बसवेश्वर हजारे तसेच आई सत्यमा हजारे व सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश पी. इंगोले सर व उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माध्दमशेटीवार सर, कला विभाग प्रमुख डॉ. प्रकाश शेंडे सर, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शंभरकर सर, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. विजय सोमाकुवर सर, रा.से.यो. प्रमुख प्रा. कुलदीप गोंड सर, तसेच त्यांचे आदर्श प्रा.अशोक तीतरमारे सर, भोयर सर, शेख सर इत्यादी गुरुजनाना दिले. तसेच नेहमी त्यांचा पाठीशी असणारे चेतन इदगुरवार, नितीन घरत, सतीश मेंढे, शुभम लोखंडे,ओमकार मोहूर्ले, मनिकंठ गादेवार, राघव सुलवावार तसेच संपूर्ण मित्रपरिवाराला दिले. त्यांनी केलेल्या कार्याचे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.