8 ते 13 मे पर्यंत वर्ध्यात कडक निर्बंध; जाणून घ्या काय सुरु, काय बंद.

✒आशीष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी ✒
वर्धा:- देशात कोरोना विषाणूचं थैमान सुरु असतानाच राज्यातही चित्र काही वेगळं नाही. दिलासा इतकाच आहे की राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. असं असलं तरीही हे जिल्हे वगळता इतर भागांमध्ये मात्र कोरोनाची दहशत कायम आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाकडून काही महत्त्वाचे निर्बंध लागू करण्यात येत आहेत. नागरिकांनीही या नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. ही सर्व परिस्थिती पाहता वर्ध्यात 8 मे पासून, 13 मे पर्यंत प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
8 मे ला सकाळी 7 वाजल्यापासून या निर्बंधांची सुरुवात होणार असून, 13 मे सकाळी 7 वाजेपर्यंत हे नियम लागू असतील. कोरोनाबाधितांची संथ्या सातत्याने वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी हे निर्देश दिले आहेत. वर्ध्यात 1 एप्रिलपासून 5 मे पर्यंत तब्बल 20104 रुग्ण आढळून आले, तर 465 रुग्णांचा मृत्यू झाला.
मेडिकल, वैद्यकीय दवाखाने, पशुचिकित्सा, वैद्यकीय सेवा सुरू राहणार. घरपोच सेवा देणाऱ्यांना ओळखपत्र आणि rtpcr टेस्ट निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक.
या काळात अत्यावश्यक सेवा, कोरोनाशी संबंधित शासकीय आणि निमशासकीय कार्यालय उघडे राहणार आहे तर इतर सर्व कार्यालये बंद राहणार आहे.
निर्बंध लागू असताना या काळात खाजगी आणि शासकीय प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.