तळोधी पोलिसांनी पकडली नवरगाव मध्ये येणारी दारू
दारू आणण्यासाठी केला किरायाच्या गाडीचा उपयोग
✒मुकेश शेंडे सिंदेवाही तालुका प्रतिनिधी✒
सिंदेवाही,8.मे:- उपविभागीय पोलिस अधिकारी, ब्रह्मपुरी यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि रवींद्र खैरकर यांनी व नापोशी विशाल शिंदे सोबत पोलीस स्टाफ स.फो.बाजीराव झाडे, पोशी नितीन कुमरे, बंडु जाधव, सुभाष पारधी, व पो.स्टे.तडौधी स्टाफ पोहवा 1436, 1721 असे मिळून मौजा तळोधी येथील शिवाजी चौकात नाकेबंदी केली असता, गुप्त माहिती प्रमाणे चार चाकी वाहन स्विफ्ट कार क्रमांक एम एच 29 आर 33 38 ची झडती घेतली असता इंपिरियल डब्ल्यू कंपनी विदेशी दारूचा माल किंमत एकूण 49200/- रुपयाच्या माल व अवैधरित्या वाहतूक कामी वापरलेले वाहन किंमत 300000 /-रुपये असा एकूण 349200 /-रुपयांच्या माल अवैधरित्या मिळून आल्याने आरोपी चालक नामे अविनाश पांडुरंग राहाटे व सचिन पराते रा. नवरगाव ता. सिन्देवाही जिल्हा चंद्रपूर याचे वर अप क्रमांक 78/ 2021 कलम 65 आ मदका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कोरोना काळात पण मोठ्या प्रमाणात दारूची आवक जावंक सुरु असल्याने पोलीस आता सतर्क झाले आहेत. त्यामुळे आता दारू वाले वेगवेगळी शकलं लढवून छुप्या मार्गाने दारू आणून विकण्याचा पर्यंत करीत आहेत. समोरील तपास सपोनि श्री खैरकर हे करीत आहेत.