वाहऽऽ रे जिल्हाधिकारी साहेब, ‘तोंड दाबून बुक्क्याचा मार ‘असा आहे तुमचा कारभार!
वाहऽऽ रे जिल्हाधिकारी साहेब, ‘तोंड दाबून बुक्क्याचा मार ‘असा आहे तुमचा कारभार!

वाहऽऽ रे जिल्हाधिकारी साहेब, ‘तोंड दाबून बुक्क्याचा मार ‘असा आहे तुमचा कारभार!

वाहऽऽ रे जिल्हाधिकारी साहेब, ‘तोंड दाबून बुक्क्याचा मार ‘असा आहे तुमचा कारभार!
वाहऽऽ रे जिल्हाधिकारी साहेब, ‘तोंड दाबून बुक्क्याचा मार ‘असा आहे तुमचा कारभार!

प्रा. श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी✒
बीड:- व्वाऽऽ जिल्हाधिकारी साहेब रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी व बुधवारी किराणा सुकामेवा मिठाईची दुकाने तीन तासासाठी का होईना उघडण्यास परवानगी दिली. एकीकडे ही परवानगी दिली असतानाच दुसरीकडे बँकांचे व्यवहार ठप्प करून आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केलात. हातावर पोट असणाऱ्या लोकांना मालकांनेच बँक बंद म्हणून पैसे दिले नाहीत तर त्यांनी खरेदी करायची कशी हा साधा प्रश्न उच्चपदस्थ अधिकाऱ्याला पडू नये हे इथल्या जनतेचं दुर्दैव आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जनतेच्या आर्थिक नाड्या आवळल्या मुळे एखाद्याच्या घरात कोणी आजारी पडला तर बँकेत पैसा असला तरी उपचार घेणार कसा?सर्वसामान्यांसाठी बँकेची कवाड तुम्ही बंद केलीत. एरवी शहरातील निम्म्याहून अधिक एटीएम पैशाअभावी बंद पडलेली असतात तर आता ती चालू असण्याचा प्रश्नच नाही. गरीब सर्वसामान्य ऑनलाइन पेमेंटची व्यवस्था करू शकत नाही कारण ग्राहक केंद्र देखील बंद आहेत मग तो पैशाअभावी दवाखान्याची पायरी चढू शकत नाही की नव्या पैशाची औषधी खरेदी करू शकत नाही.पैशाशिवाय कूठलाच खाजगी दवाखाना रूग्णाला एडमिट करून घेत नाही. आशा हॉस्पिटल विरोधात कारवाई करण्याची धमक तुमच्यात नाही अशा स्थितीत लोकांनी जीव सोडून द्यायचा का? हि जनभावना तुम्ही समजून घेणार आहात का? असा आता विचारल जाऊ लागला आहे.

‘दुखणं म्हशीला, इंजेक्शन पखालीला ‘अशी काहीशी स्थिती सध्या जिल्हा प्रशासनाची झाली आहे. कोरोना रुग्णसंख्या जिल्ह्यात वाढत असताना आणलेल्या निर्बंधांमुळे आधीच व्यावसायिकांच कंबरडं मोडले आहे. याबरोबरच हातावर पोट असणाऱ्या लोकांची परिस्थिती देखील अतिशय वाईट झाली आहे. रोज किराणा दुकानातून ‘छटाक ‘सामान घेऊन येत पोटाची खळगी भरणाऱ्यांची संख्या कमी नाही. सरकारने घोषणा केलेल्या मोफत धान्याची सोय राशन दुकानातून अद्याप झालेली नाही. त्यातच पूर्वी असलेले निर्बंध आणखी कडक करत जिल्हाधिकारी साहेब तुम्ही सर्वच बाजूंनी सर्वसामान्य जनतेची कोंडी केली आहे. सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजन इतकाच पैसा देखील महत्त्वाचा झाला आहे. जनतेच आर्थिक चलन फिरू न दिल्यास लोक घराच्या बाहेर खरेदी करण्यासाठी पडणार नाहीत यासाठी आर्थिक कोंडी निर्माण केलीत.

पण एक सांगा एखाद्या मजूराला मालकाने पैसा बँक बंद आहे म्हणून दिलाच नाही तर त्याने छटाक सामान आणून रोज पोट भरायचं कसं ? ऊसनवारी पैसा तरी कोण देईल किराणा दुकानदारही अशा माणसांना दुकानाच्या दारात ही उभा करत नाही. अशा स्थितीत त्या मजूरानं जगायचं कसं? एकीकडे मंगळवार बुधवारच्या दिवशी थोडीशी शिथिलता जिल्हाधिकारी साहेब आपण दिलीत. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर किराणा, सुकामेवा, मिठाई सोबतच चिकन मटण विक्रीचे दुकान उघडण्यास परवानगी दिल्याचं मोठेपणाने आदेशात सांगितलं. पण बेरोजगारी व आपण निर्माण केलेल्या आर्थिक कोंडी मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांनी खरेदी करायची कशी? रोजंदारी करणारांना पैसा उसना तरी देणार कोण व कसा ? असा साधा प्रश्न देखील व्यवस्था ला राबवणाऱ्या आपल्यासारख्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला पडू नये हे बीडकरांच दुर्दैव आहे.

ही बाब झाली सण समारंभाची पण जिल्हाधिकारी साहेब एखाद्याच्या घरात कोणी आजारी पडले तर उपचारासाठी दवाखान्याची पायरी चढणे गरजेचे असते. बीड जिल्ह्यातला कुठला दवाखाना पैसे नसणाऱ्या कफल्लक माणसावर उपचार करतो हे तरी सांगा ? घरापासून रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी वेळेवर वाहनाची सोय पैसा नसेल तर कशी होणार ? बँकेत पैसा असला तरी त्या माणसाचा पैशाअभावी जीव जाणार नाही का? बरं अशी घटना घडलीच तर रेमडीसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या विरोधात तुम्ही कारवाई करू शकला नाहीत. तिथे पैशाअभावी एखाद्या रुग्णाला उपचार मिळाला नाही. रुग्णालयाने रुग्णाला ॲडमिट करून घेतले नाही. त्या रुग्णाला प्राण गमवावे लागले तर अशा हॉस्पिटल विरोधात कारवाई करण्याची धमक तुमच्या मधे आहे का ? आजपर्यंतच्या अनुभवावरून तरी निश्चितच नाही. मग जिल्हाधिकारी साहेब बँकांची दरवाजे सर्वसामान्यांसाठी बंद ठेवून लोकांना तोंड दाबून बुक्क्याचा मार कुठपर्यंत देणार ? लहरी राजा प्रजा आंधळी असं म्हणण्याची वेळ सध्या बीडच्या जनतेवर येऊन ठेपली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here