कचरा व्यवस्थापन प्रकिया प्रकल्पात भीषण आग
रवी आत्राम
भद्रावती शहर प्रतिनिधी
मो.न.9890897029
चंद्रपूर:- सविस्तर या प्रमाणे चंद्रपूर व बल्लारपूर मार्गावर असलेल्या घनकचरा व्यस्थापना प्रकिया प्रकल्पास भीषण आग.
आज दिनांक 09/05/2022 ला पहाटे 3.30 ते 4 च्या सुमारार चंद्रपूर ते बल्लारपूर मार्गावरील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भीषण आग आगली त्या आगीचा लहर एवढा मोठा होता की आग वाढतच गेली लोकांच्या लक्षात येतात आगीला संपुष्टात आणायचा प्रयत्न केला परंतु आग एवढी भीषण होती की फायर ब्रिगेडच्या कार्यकर्त्याना बोलवण्यात आले त्या नंतर पहाटे 4 ला लागलेली आग आज सकाळ ला 11.30 ला विझविण्यात यश आले
आग आटोक्यात आणण्यासाठी सर्वात मोठी कामगिरी चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन फायर ब्रिगेड चंद्रपूर,बल्लारपूर नगरपरिषद फायर ब्रिगेड व चंद्रपूर महानगर पालिका फायर ब्रिगेड यांची मौल्याची कामगिरी बजावली