नागभीडकरांच्या सेवेत तीन पाणी टँकर दाखल
पाणी टंचाई वर मात करण्यासाठी नागभीड नगरपरिषदेणे खरेदी केले तीन टँकर
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभीड– दरवर्षी उन्हाळा आला की नागभीड नगरपरिषद क्षेत्रातील अनेक गावात तसेच नागभीड मधील काही प्रभागात तीव्र पाणी समस्या निर्माण होते.अश्या वेळी नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी खाजगी कंत्राटदाराकडून किरायाने टँकर घेऊन पाणी पुरवठा केला जात होता. यामुळे अनेकदा अनेक अडचणी निर्माण होत होत्या तसेच नगरपरिषद क्षेत्रातील बांधकाम करताना सुद्धा अश्याच प्रकारे पाणी व्यवस्था केली जात होती.यामुळे बरेच आर्थिक नुकसान होत होते.या समस्यांवर मात करण्यासाठी नागभीड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रा.डॉ. उमाजी हिरे,उपाध्यक्ष तथां पाणी पुरवठा सभापती गणेश तर्वेकर,बांधकाम सभापती सचिन आकुलवार व इतर सर्व सभापती व नगरसेवक यांच्या कल्पनेतून तीन पाणी टँकर नगरपरिषदेणे जनतेच्या सेवेसाठी खरेदी केले असून त्याचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष प्रा.डॉ. उमाजी हिरे,उपाध्यक्ष तथां पाणी पुरवठा सभापती गणेश तर्वेकर,बांधकाम सभापती सचिन आकुलवार,आरोग्य सभापती अर्चना मरकाम मुख्याधिकारी राहुल कंकाळ,नगरसेवक गौतम राऊत ,रूपेश गायकवाड ,पाणी पुरवठा अभियंता ऊमेश शेंडे,. नितीन दुपारे यासह नगरसेवक , नगरपरिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.
प्रतिक्रिया:
या उपलब्ध झालेल्या नवीन पाणी टँकर मुळे पाणी समस्या सोडविण्यासाठी वेगवान पाऊले उचलली जाणार आहेत तसेच इतर कामाप्रसंगी सुद्धा यांचा उपयोग होणार आहे.
गणेश तर्वेकर
उपाध्यक्ष- नगरपरिषद नागभीड,