खेळताना पडल्यानं मुलाच्या कपाळाला जखम झाली. डॉक्टरांनी त्याच्या जखमेवर टाके घालण्याऐवजी तिथे फेविक्विक लावलं. पोलिसांनी डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली आहे.

अश्विन गोडबोले

मो: 8830857351

हैदराबाद,9 मे:  तेलंगणातील जोगुलंबा गडवाल जिल्ह्यात एका खासगी रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खासगी रुग्णालयातील डॉक्टरच्या बेजबाबदारपणाविरोधात पीडित मुलाच्या वडिलांनी पोलीस तक्रार दाखल केली आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलाच्या कपाळावरील जखमेला टाके घालण्याऐवजी तिथे फेविक्विक लावलं. याबद्दल मुलाच्या वडिलांनी पोलीस तक्रार नोंदवली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

कर्नाटकच्या रायचूर जिल्ह्यातील लिंगसोगूरमध्ये राहणारे वंशकृष्ण त्यांची पत्नी सुनीता आणि मुलगा प्रविणला घेऊन तेलंगणात राहत असलेल्या एका नातेवाईकाकडे लग्नासाठी गेले होते. त्यावेळी प्रविण खेळताना पडला. त्याच्या कपाळाला इजा झाली. डाव्या डोळ्याच्या वरील भागात दुखापत झाल्यानं रक्तस्राव झाला. जोगुलंबा गडवाल जिल्ह्यातील आइजा येथील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रविणच्या कपाळावर झालेल्या जखमेवर टाके घालण्याऐवजी फेविक्विक टाकून उपचार केले. ही बाब प्रविणच्या वडिलांना समजली. त्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार दाखल केली. यानंतर आरोपी डॉक्टरविरोधात कारवाई करण्यात आली.

वंशकृष्णनं घडलेल्या प्रकाराची तक्रार आइजा पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. डॉक्टरांनी फेविक्विक टाकून उपचार केल्यानं त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात एकच गोंधळ घातला. आता पोलीस या प्रकरणात काय कारवाई करतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here