जागतिक मातृदिन विशेष: आई मायेचा सागर…!

सौ.संगीता संतोष ठलाल 

मु.कुरखेडा जि.गडचिरोली 

मो: ७८२१८१६४८५

वर्षभरात अनेक सण, उत्सव तसेच होऊन गेलेल्या महा विभूतींच्या जयंती,पुण्यतिथी येत असतात कारण त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजाच्या विकासासाठी, माणसाच्या कल्याणासाठी वाहले आहेत म्हणून आपण सर्वजण त्यांना वंदन करत असतो. तसच प्रत्येकांची प्रथम देवता व गुरू असलेली निसर्गाची देण सर्वात मोठी शक्ती म्हणजेच आई होय. म्हणून आज जागतिक मातृदिन जिकडे, तिकडे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्या निमित्ताने जगातील सर्व माता,भगिणींना मातृदिनाच्या हार्दिक, हार्दिक शुभेच्छा.

कोणी म्हणतात की, आज माझ्याजवळ सर्वकाही आहे पण, मला आई नाही म्हणून आज मी कुठेतरी कमी पडत आहे याचे खरे कारण म्हणजेच आईसारखी माया, करणारी व जवळ घेणारी दुसरी कोणतीही व्यक्ती नसते आणि जर..असेल ते, भाग्यच म्हणावे लागेल पण, प्रत्येकाला तसे भाग्य लाभत नसतात तेही तेवढेच खरे आहे. 

आई सारखी कोणी नाही 

आई सारखी शक्ती नाही 

आई आहे तर सर्वकाही आहे 

तिच्यासारखी कोणी नाही 

 बरेचजण आई या विषयावर लिहीत असतात आईची महिमा, तीची गाथा लिहितात कोणी हृदयस्पर्शी रचना लिहितात आई विषयावरचे लिखाण वाचून अक्षरशः आपोआप डोळ्यात अश्रू येत असतात असे का म्हणून होत असेल. ..? कारण, ती शेवटी आईच असते ती, मायेचा सागर असते ती, कलागुणांची खाण असते, ती दयाळू असते ती, धाडसी असते एवढेच नाही तर..ती संघर्ष करणारी व स्वतः चे अश्रू लपवून जगणारी जननी असते. प्रत्येक मुलगा जेव्हा, बोलायला लागतो तेव्हा, आई असे बोबळे बोल त्यांच्या मुखातून बाहेर पडत असतात. तेव्हा, निसर्गाला सुद्धा हेवा वाटत असतो कदाचित माझी आई आज असती तर..मी सुद्धा आई म्हणून हाक मारली असती म्हणून तो गहिवरून जातो एवढी गोडी आई या नावात आहे. म्हणतात ना की, “मा किसीके आगे नहीं झुकती मा के आगे सारी दुनिया झुकती हैं” म्हणून कोणताही मुलगा असो किंवा मुलगी कितीही मोठे झाले असतील तरी दहा लोकात किंवा भर रस्त्यावर आईच्या चरणी नतमस्तक होतात हीच आमची भारतीय संस्कृती आहे. अनेकदा बघायला मिळत असते बघून कुठेतरी मनाला समाधान मिळतो व हि संस्कृती आमच्या भारत देशात आहे या मातीत आहे. आई या नावात सारा विश्व सामावला आहे. 

 

   आई तुझ्याकडे बघताना

   दु:ख सारे पळून जातात 

   तू जननी आहेस ग आई 

   म्हणून तुला वंदन करतात

 

आई होणे प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील एक वेगळा आनंद असतो जेव्हा, ती आई बणते त्यावेळी तीला सर्वकाही मिळाल्यासारखे वाटते लेकरा च्या मुखाकडे पाहून डोळ्यात आनंदाश्रू आणते व मायेने त्याला कुरवाळत असते, कोणाची दृष्ट लागू नये म्हणून चार लोकात सुद्धा पदर झाकून लेकराला दुध पाजते बघा! त्या पदरात किती ताकद असेल ..? ना ऊन लागत ना,थंडी, लागत नाही पावसाचे थेंब पडत त्या पदराला विसरणे शक्यच नाही अशी ती जननी आई असते.

दहा जन्म घेतले तरी आईचे उपकार कोणीही फेडू शकत नाही. तिच्या त्यागाची कोणी किंमत मोजू शकत नाही, तिच्या कष्टाची बरोबरी कोणी करू शकत नाही, तिची मायेची थाप कोणाकडे नसते एवढेच नाही तर. .ती जेव्हा भाजी, भाकरी बणवून घास भरवते ना तशी चव इतर कोणत्याही ठिकाणी नसतो ती चव व तो मायेचा स्पर्श फक्त आईच्या हातात असते. 

आईविना जग वाटे सुना

कुठे तू गेलीस ग सोडून 

आई तुझी आठवण येते 

येना आतातरी धावून

बरेचदा लहान लेकरांना आपण रडताना बघत असतो क्षणभर आई घरी नसली की, ते रडायला सुरुवात करतात, एवढा घर शोधून काढतात “माझी आई कुठे गेली, आई येना ग तुझी आठवण येते” ती हाक व ते अश्रू खोटे नसतात तर..ती आई येण्याच्या वाटेकडे लागलेले डोळे व ओढ असते. लगेच तीच हाक आईला कळते आणि ती जननी लेकरासाठी धावून येते. पण,ज्यांची आईच या जगात नसेल…तर मात्र ती हाक ऐकून कोणीही धावून येत नाही यात खऱ्या अर्थाने आई काय असते आपले अंतकरण आपल्याला सांगत असते. आई मायेचा सागर आहे, आई सर्वस्व आहे ती आहे म्हणुन जग आहे. म्हणून आईला समजून घेणे प्रत्येकांची जबाबदारी आहे. आई फक्त, आईच असते मी तेवढी मोठी नाही फक्त मी तीला वंदन करु शकते कारण, तिच्यामुळे मला सुंदर असे जग बघायला मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here