स्वाभिमानी व महान योध्दा महाराणा प्रतापसिंह

62

स्वाभिमानी व महान योध्दा महाराणा प्रतापसिंह

रमेश कृष्णराव लांजेवार

मो.नं.9921690779

मेवाडचे महाराणा प्रतापसिंह हे नाव जगप्रसिद्ध आहे. मेवाडच्या सिंहाने अकबरासारख्या बलाढ्य बादशहाशी, मेवाड आणि राजपुताना यांच्या स्वातंत्र्यासाठी 25 वर्षे तहानभूक विसरून लढा दिला. मेवाडचे स्वतंत्र टिकवण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाला इतिहासात तोड नाही. प्रतापसिंहाच्या तेजाने केवळ राजपुतानाच नव्हे तर संपूर्ण भारत प्रभावीत झाला होता. त्यामुळेच प्रतापसिंहांना संपूर्ण भारतात पूज्य मानले जाते.भारतीय इतिहासात महाराणा प्रताप यांना मोलाचे स्थान आहे. कारण महाराणा प्रताप यांच्या नावानेच त्या काळी मुगल घाबरत असे. त्यामुळेच भारत भुमिला महाराणा प्रतापांचा अभिमान आहे.

महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 साली उत्तर दक्षिण भारतातील मेवाड येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राणा उदयसिंह. मेवाड, बुंदेलखंड आणि सिरोही वंशातील काही राजे आपला स्वाभिमान,धर्म आणि स्वतंत्रता टिकवून ठेवण्यासाठी अकबराशी प्राणपणाने लढले.पुढे उदयसिंह मेवाडचा राजा झाला.चित्तोडच्या युद्धानंतर चार वर्षानी दिनांक 3 मार्च 1572 ला उदयसिंहाचे निधन झाले.यानंतर मेवाडचे सुत्र महाराणा प्रतापसिंह यांच्याकडे आले व त्यांचा राज्याभिषेक झाला.ज्यांचे नाव घेतल्याने सर्वांनाच स्फुर्ती येते असे महान तेजस्वी योध्दा म्हणजे महाराणा प्रताप.महाराणा प्रतापांनी प्रतीकुल परिस्थितीतही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मेवाडचे रक्षण केले.

जयपूरचा राजा मानसिंग याने अकबरापासुन आपल्या राज्याला धोका पोहचू नये, म्हणून आपली बहीण अकबराला देऊन सोयरीक केली.अकबराने मेवाडला आपल्या अधिपत्याखाली आणण्यासाठी मानसिंहाला मेवाडला जाण्यास सांगितले.त्या निमित्ताने मानसिंग दिल्लीला जात असतांना वाटेत मुद्दाम आपल्या वैभवाचे प्रदर्शन करण्याकरिता कुंभगडावर असलेल्या महाराणा प्रताप यांच्या भेटीस गेला.महाराणा प्रताप यांनी त्यांचा आदरसत्कार केला.परंतु मानसिंगच्या पंक्तीत बसून जेवण्यास नकार दिला. मानसिंहने याचे कारण विचारले.यावर महाराणा प्रताप म्हणाले स्वतःच्या समशेच्या बळावर आपल्या राज्याचे रक्षण करण्याऐवजी जे राजपूत आपल्या मुली-बहिणी मोगलांना देऊन त्यांच्यापासून राज्य रक्षण करतात,अशा अस्वाभिमानी रजपूतांच्या पंक्तीला मी बसत नाही.मी जर आपणासोबत जेवण केले तर बाप्पा रावळ,राणा संग ह्या सारख्या थोर वंशाला काळीमा फासण्यासारखे होईल.हे ऐकून मानसिंहच्या मनात खटकले आणि महाराणा प्रतापसिंह यांना धमकी देत म्हणाला महाराणा प्रतापसिंहजी आज आपण माझा अपमान केला ह्याचा बदला रणांगणात अवश्य घेईल व मानसिंह काय आहे हे दाखवून देईन. असे म्हणून तेथुन निघुन गेला आणि मानसिंग व महाराणा प्रतापसिंह यांच्यात कट्टर वैरत्व निर्माण झाले.

 

ही घटना अती शिगेला पोहोचली व युध्दात रूपांतर झाले.राणाजींचे वक्तव्य नेहमीच मानसिंहला खटकत होते.ही संपूर्ण घटना अकबराला मानसिंहाने सांगितली.पहिलेच मानसिंग तिलमिला झाला आणि अकबराला मेवाड पाहिजे होते या करीता अकबर सर्वत्र जहर घोळत होता.अशा परिस्थितीत अकबराने मानसिंहाच्या नेतृत्वाखाली दोन लाख प्रचंड सैन्य आणि अकबराचा मुलगा सलीम याला घेऊन हल्दीघाटीच्या दिशेने महाराणा प्रताप यांच्याशी युध्द करायल निघाला.

ही बातमी महाराणा प्रतापसिंह यांना कळताच त्यांनी आपले बावीस हजार सैन्य घेऊन अरवली पर्वताच्या कुंभलगड वाटेने जाणाऱ्या मानसिंगाच्या सैन्यावर बाणांनी छुपे हल्ले करून बरेचशे सैनिक धाराशाही केले.दोन लाख सैन्याशी बावीस हजार सैन्य लढा देत होते. महाराणा प्रतापसिंह यांच्या तलवारीचा वार अकबराचा मुलगा सलीमवर बसणार तितक्यात सलिमचा हत्ती हालला आणि तो तलवारीचा वार हत्तीवर बसला आणि सलिम वाचला.महाराणा प्रतापांच्या भितीने मानसिंग आपल्या सैन्यासह पिछाडीवर रहाला.हे घनघोर युद्ध अनेक दिवस चालले. राणाजी आपल्या तलवारीने वेढा कापत सामोरं जाण्याचा प्रयत्न करू लागले.महाराणा प्रताप जखमी झालेले पाहुन मानसिंह अत्यंत दु:खी झाला.आपण कुठेतरी चुकत आहोत हे त्यांच्या लक्षात आले व मेवाडच्या रक्षणासाठी आपण येथुन निघून जाण्यास विनंती केली व प्रतापसिंहानी ती मान्य केली.प्रतापाचे छत्र आणि मुकुट मानसिंहाने स्वतः डोक्यात घातले.

मानसिंहाला महाराणा प्रताप समजून मोगलांनी आक्रमन केले.अनेक मोगलांना त्यांनी ठार मारले व शेवटी विरगतीला प्राप्त झाला.तेवढ्यात शत्रू सैनिकाने राणाजींच्या घोडा चेतक याच्या पायावर तीर सोडून वार केला.त्याचा पाय नीकामी झाला.अशाही परिस्थितीत स्वामिनिष्ठ घोड्याने वेढ्याचा भेद करून दूर निघून गेला.वाटेत एक ओढा लागला चेतकने उडी घेऊन तो ओढा पार केला आणि काही दुर जाऊन चेतकने प्राण सोडला.आपला पाठलाग कोण करीत आहे हे पहाण्यासाठी राणाप्रतापांनी मागे फिरून पहाले.तर अकबराला जाऊन मिळालेला आपला धाकटा भाऊ शक्तिसिंग  त्यांच्या बरोबरच्या चार-पाच मोगल सैनिकांना जिवे मारीत होता.राणाजी हे दृश्य पाहून अचंबित झाले. यानंतर शक्तीसिंह राणाजींजवळ आले आणि त्यांना आलिंगन देऊन म्हणाला दादा तुझ्या सारखे शौर्य आणि कणखर मन याच्या अभावामुळे मी जरी मोगलांची सरदारकी करीत असलो तरी तूच माझा आदर्श आहे.

या हल्दीघाटीच्या युद्धानंतर अकबराने महाराणा प्रतापसिंह यांच्यावर अनेक आक्रमणे केली.मात्र तो महाराणा प्रतापसिंह यांना पराभूत करू शकला नाही.हल्दिघाटीतील युद्ध हे इतिहासातील सर्वात मोठे युद्ध मानल्या जाते. शेवटचा उपाय म्हणून अकबराने पराक्रमी योद्धा जगन्नाथला मोठ्या सेनेसह 1584 मध्ये मेवाडवर आक्रमण करण्यास पाठविले.परंतु 2 वर्षे अथक प्रयत्न करूनही तो महाराणा प्रताप यांना पकडू शकला नाही.अशा प्रकारे प्रबळ महत्वाकांक्षी, दृढनिश्चयी, धैर्यशील, उज्वल कीर्तीवंत आणि साहसी अशा महाराणा प्रतापाला नमविण्याचा प्रयत्न अकबराने केला पण तो निष्फळ ठरला. 21 जून 1576 रोजी चेतकने(घोड्याने)महाराणा प्रतापसिंहांना निरोप दिला.आजही हल्दीघाटी येथील राजसमंद येथे चेतकची समाधी आहे.त्याकडे पहाणारे सर्वच प्रतापांच्या मूर्तीप्रमाणेच श्रध्देने पाहतात.19 जानेवारी 1597 रोजी महाराणा प्रतापसिंह यांची प्राणज्योत मालवली.

भारतीय इतिहासात महाराणा प्रतापसिंहाचे नाव राष्ट्र, धर्म, संस्कृती, स्वाभिमान यासाठी आजही मानाने घेतले जाते.महाराणा प्रतापसिंहांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम!