काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खरगे जी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मनीकांत राठोडवर गुन्हा दाखल करा – गडचिरोली जिल्हा काँग्रेसची मागणी
अमित सुरेश वैद्य
मो: 7499237296
गडचिरोली : अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन खरगे जी व त्यांच्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी भारतीय जनता पार्टीचे चित्तपुर, (कर्नाटक) विधानसभेचे उमेदवार मनीकांत राठोड यांनी दिली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून मनीकांत राठोड हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसम आहे. कर्नाटकात त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. मा. खर्गे साहेब व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवाला धोका संभवतो.
काँग्रेस अध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतरही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी बघ्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचा निषेध करण्यात आला असून. मनीकांत राठोडवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.
स्थानिक गडचिरोली पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदविताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, शहर अध्यक्ष सतीश विधाते, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, माजी नगरसेवक सुरेश भांडेकर, काँग्रेस नेते हरबाजी मोरे, जितेंद्र मुनघाटे, नितेश राठोड, जावेद खान सह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.