सार्वजनिक ठिकाणी पानपोईची व्यवस्था करा- राजकुमार वर्मा

सार्वजनिक ठिकाणी पानपोईची व्यवस्था करा- राजकुमार वर्मा

सार्वजनिक ठिकाणी पानपोईची व्यवस्था करा- राजकुमार वर्मा

सार्वजनिक ठिकाणी पानपोईची व्यवस्था करा- राजकुमार वर्मा
🖋️साहिल सैय्यद……
घुग्घुस तालुका प्रतिनिधि
📲 9307948197

घुग्घुस : येथील सार्वजनिक ठिकाणी पानपोईची व्यवस्था करा अशी मागणी काँग्रेसच्या अनु. जाती विभागाचे तालुका अध्यक्ष राजकुमार वर्मा यांनी न. प. ला दिलेल्या निवेदनातून केली आहे.

शहराची लोकसंख्या ५० हजाराच्या जवळपास आहे. सध्या तीव्र उन्हाळा सुरु आहे भीषण गर्मी मुळे नागरिक त्रस्त झाले आहे. लग्न सराई सुरु असल्याने नागरिकांना बाहेर गावी ये-जा करावे लागते.

शहरात सार्वजनिक ठिकाणी पानपोई नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. वेकोलि, लॉयड्स मेटल्स कंपनी, एसीसी कंपनी अशा कंपनीला आदेश देऊन शहरात पानपोई सुरु करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी तालुका अध्यक्ष राजकुमार वर्मा, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.