एस. टी. बस सुरु करण्याकरिता घुग्घुस वणी मार्गावर परीक्षण

एस. टी. बस सुरु करण्याकरिता घुग्घुस वणी मार्गावर परीक्षण

एस. टी. बस सुरु करण्याकरिता घुग्घुस वणी मार्गावर परीक्षण
🖋️ साहिल सैय्यद….
घुग्घुस तालुका प्रतिनिधि
📲 9307948197

घुग्घुस :- एस. टी. महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी पुरुषोत्तम व्यवहारे, वाहतूक अधीक्षक गोमासे यांच्या उपस्थितीत घुग्घुस वणी मार्गावर उड्डाणपुलाचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी गुरुवार, ९ मे रोजी बस चालवून परीक्षण करण्यात आले.

परीक्षण पुर्ण झाल्यानंतर लवकरच घुग्घुस वणी बससेवा नियमित सुरु होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना दिलासा मिळणार आहे. घुग्घुस वणी मार्गावरील एस. टी. बस मागील जवळपास एक ते दीड वर्षापासून बंद आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, आजारी रुग्ण, छोटे व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते, दैनंदिन प्रवासी यांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

याबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच राजुरा विधानसभा निवडणूक प्रमुख देवराव भोंगळे यांच्या अथक प्रयत्नांनी व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे यवतमाळ जि. प. चे माजी सदस्य विजय पिदुरकर यांनी केलेल्या अथक पाठपुराव्याने आणि भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या परिश्रमाने बससेवा सुरु होणार आहे.

यावेळी जि. प. चे माजी सदस्य विजय पिदुरकर, भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजपा जिल्हा सचिव विनोद चौधरी, भाजपाचे शाम आगदारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here