डॉक्टरांच्या लापरवाईने एका गर्भवती महीलेचा मृत्यू

डॉक्टरांच्या लापरवाईने एका गर्भवती महीलेचा मृत्यू

डॉक्टरांच्या लापरवाईने एका गर्भवती महीलेचा मृत्यू

✍️ सुमित देशमुख ✍️
अमरावती उपतालुका प्रतिनिधी
📞 9022532630📞

अमरावती : डॉ. पंजाबराव देशमुख हाँस्पिटल येथे सौ. मनोरमा जगदीश कुणबीथोप रा, गोळेगाव तालुका -नांदगाव खंडेश्वर, जिल्हा -अमरावती,
ही महिला दिनांक 4/05/2024,पासुन उपचार घेत असल्याचे स्पष्ट झाले आणि ही महिला गर्भवती असल्याचं दिसून आले आणि तिला अगोदर सिजर सर्जरी सांगितले आणि मग अचानक नाँरमल डिलीवरी करण्याचे सांगितले, आणि हे करून डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी आय सी यू मध्ये दाखल केले असून त्या ठिकाणी पेशंटला बरोबर उपचार होत नाही असे आढळून आले आणि डाँक्टर हे झोपून आपली जबाबदारी पार पाडत असल्याचे स्पष्ट झाले, पेशंटचे नातेवाईक याचे म्हणूनने आहे की पेशंट सोबत बोलु देत नाही औषध बोलावून त्यांना देत नाही, आणि दि. 9/5/2024रोजी सकाळी 4वाजता जेव्हा पेशंट आँकसिजन वर असुन तिला त्रास जाणवत असून त्या डाँक्टर झोपुन होते ती महीला तडपत असुन ते बाहेरूनचित्र नातेवाईक यांनी पाहल जेव्हा ते आत गेले तेव्हा ती महिला मृत्यू पावली होती तरी डाँक्टर सांगायला तयार नाही ती पेशंट बोलत नाही असे नातेवाईक विचारु लागले तेव्हा तेथील डॉक्टर स्टाफ म्हणाला की हृदय बंद पडल,
हे सर्व विचारात घेऊन त्यात डॉक्टर यांनी लापरवाई केल्याचे दिसून येत आहे
आणि नातेवाईक यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली, आणि संबंधित डॉक्टर यांच्या वर गुन्हा दाखल करा व अटक करा अशी मागणी केली, आणि त्या वेळी पोलीस अधिकारी यांनी डॉक्टर व तेथील स्टाफ यांना ताब्यात घेतले व पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here