तळा शहरात अवतरली शिवशाही पारंपरिक पद्धतीने तीथीनुसार शिवजयंती साजरी.

तळा शहरात अवतरली शिवशाही पारंपरिक पद्धतीने तीथीनुसार शिवजयंती साजरी.

तळा शहरात अवतरली शिवशाही पारंपरिक पद्धतीने तीथीनुसार शिवजयंती साजरी.

किशोर पितळे:.तालुका प्रतीनीधी
९०२८५५८५२९

तळा :- तळा तळगड किल्याच्या पायथ्याशी वसलेले तळापुसाटीवाडी.शिवकालीन संरक्षणासाठी मावळ्यांना वस्ती दिली. हाइतिहाससाक्षीलाआहे.यापुसाटीवाडीत छत्रपती शिवाजी महाराजाची पारंपारीक पध्दतीने तिथी नुसार चैत्र शुद्ध २/ ३अक्षय्य तीथीच्या पुर्व संध्येला गेली ५९ वर्षापासून साजरी केली जाते. १९६५ साली कै.दगडू सांवत,भालचंद्र (भाऊ)साठे,रामकृष्ण (भाऊ)टीळक, विठ्ठल टीळक,अँड.विद्याधर धामणकर, नारायण(बाळ) दलाल यांच्या संकल्पनेतून शिवमंदिर उभारणी करुन तीथीनुसार साजरी केली जाते.तीआज मिती पर्यत वारसा पुढे जपला आहे. शिव मिरवणुकीत शिवरायाची हुबेहूब जीवंत प्रतिकृती समीर(श्याम)सांवत यांनी साकारली होती श्री तुळजा भवानी नी तलवार छ.शिवाजी महाराजांना देतानाची ही प्रतीकृती साकारून इतिहास जागा केला.हि कलाकृती कलाकार आकाश शिंदे यांनी केली होती.हे शिवजयंती चे खास आकर्षण होते जिल्ह्यात एकमेव शिव मंदिर असलेले तळा तालुक्यातील पुसाटीवाडी. या निमित्ताने ९मै २४ रोजी सकाळी ६वा.महाराजांवर अभिषेक सोहळा, ७.३०वा.(गारद) शिवगर्जना,८वा.शिवज्योत, सकाळी ८.३०वा.रांगोळीस्पर्धा,दुपारी१२वा. वा. महाप्रसाद,३ वा.(गारद)शिव पालखी मिरवणूक,रात्री८वा.पालखी आगमन, रात्री११वा.ज्ञानेश्वर भजन पेण दि.१०मे.२४ अक्षय्य तृतीया सकाळी ८वाजता
श्री सत्यनारायण महापुजा, सकाळी.११ते दु.२निबंध स्पर्धा व महाप्रसाद, ३ते४ वा.फनी गेम लहान मुलांचे, सांस्कृतीक कार्यक्रम,सायं. ४ ते ६ महीलांचे पैठणी कार्यक्रम खेळ (महिला)रात्री९वा. सत्कार व बक्षीस समारंभ रात्री ११ वा.सांस्कृतिक कार्यक्रम नृत्यस्पर्धा अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती दोन वेळा साजरे करणारे व महाराष्ट्रात एकमेव शिवाजी मंदीर असणारा तळा एकमेव तालुका असून अनेक पर्यटक शिवप्रेमी आवर्जून तळागडाला व मंदिराला भेट देतात. या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थ, महींला मंडळ,शिवसम्राट मुंबईकर मंडळ पुसाटीवाडी शिवप्रेमी,शिवसैनिक सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here