डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या बागेत सापडला 669 ग्राम वजनाचा हापूस आंबा.
आमदार महेंद्र दळवी व विविध स्तरातून कौतुक.
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध आंबा बागायतदार डॉक्टर जगन्नाथ मारुती पाटील यांच्या बागेत सुमारे 669 ग्रॅम वजनाचा हापूस आंबा सापडला असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे महत्त्वाचे म्हणजे आमदार महेंद्र दळवी तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ एफएमसी मार्केट नवी मुंबई वाशी येथील व्यापारी वर्ग तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी व रायगड जिल्ह्यातील आंबा बागायतदार यांच्याकडूनही अभिनंदन होत आहे.
रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध आंबा बागायतदार व आंबा उद्योजक स्वर्गीय मारुती नागू पाटील मारुती मास्तर यांनी अलिबाग तालुक्यासह रायगड जिल्ह्यात हापूस आंब्याचे उत्पादन चांगल्या प्रकारे घेण्यास त्यांचे मोलाचे योगदान आहे त्यांच्या निधनानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंबीय चांगल्या प्रकारे कार्यरत असून उद्योग व्यवसाय प्रगती केली आहे. काही दिवसापूर्वी डॉ.संदेश पाटील यांच्या वाडीत ६६०ग्राम वजनाचा हापूस आंबा काढला होता .आज त्याचे बंधू डॉ.जगन्नाथ पाटील यांच्या वाडीत ६६९ ग्राम वजनाचा दर्जेदार हापूस आंबा काढण्यात आला त्या बद्दल त्याचे सर्व विभागातून अभिनंदन केले जात आहे.याच्या कुटुंबातून वरूण पाटील याने सत्तत दोन वर्षे रायगड मधून प्रथम आंबा पाठविण्याचा मान मिळविला होता.
गेली अनेक वर्ष एफएमसी मार्केट नवी मुंबई वाशी येथे ट्रकच्या ट्रक भरून हापूस आंब्याची निर्यात होत होती. मात्र 2022 ते 2025 दरम्यान बदलते हवामान अवकाळी पाऊस नैसर्गिक होणारे बदल वातावरण कधी पाऊस थंडी अशा बदलत्या हवामानामुळे हापूस आंब्याच्या निर्यातीत सुमारे 60 टक्के तूट झाल्याने अलिबाग तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना मोठी नुकसान सहन करावी लागत आहे. विशेष म्हणजे हापूस आंब्याचे उत्पादन तीस ते पस्तीस टक्के उत्पादन अनेक संकटावर मात करून मिळत आहे. महत्वाचे म्हणजे हापूस आंब्याचे चांगले उत्पादन घेण्यासाठी औषधे खते फवारणी मनुष्यबळ त्यांच्यावर मोठा खर्च होतो तसेच कमी उत्पादनामुळे मोठा फटका आंबा बागायत दारांना सहन करावा लागत आहे. मात्र भविष्यात अशी स्थिती निर्माण झाल्या आंबा बागायतदारांवर भीषण संकट वाढवण्याची शक्यता डॉ जगन्नाथ पाटील यांनी व्यक्त केली .
अवकाळी झालेले वादळ व पावसामुळे आंबा बागातदार याचे खूप नुकसान झाले आहे.
जिल्हा प्रशासन कृषी विभाग संबंधित खात्याचे मंत्री महोदय तसेच शासनाने योग्य ती दखल घेणे गरजेचे आहे. तसेच आंबा बागायत दारांना आर्थिक सहकार्य मिळणे गरजेचे आहे.
डॉ.संदेश पाटील
आंबा बागायतदार