वडघर गोरेगाव येथे राष्ट्रीय युवा छावणी शिबीर संपन्न

वडघर गोरेगाव येथे राष्ट्रीय युवा छावणी शिबीर संपन्न

✍️सचिन सतीश मापुस्कर✍️
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
📞8698536457📞

दिघी – साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट,वडघर -गोरेगाव ,ता.माणगाव आयोजित राष्ट्रीय युवा छावणी २०२५ चे सात दिवसीय निवासी शिबीर मोठया उत्सवात संपन्न झाले.
राष्ट्रीय युवा छावणी शिबीर हे दि.१ मे २०२५ ते दि. ७ मे २०२५ या कालावधीत संपन्न झाले .या शिबिरामध्ये -आकाशवाचन ,पक्षी निरीक्षण, ट्रेकिंग ,सनसेट पॉईंट ,श्रमदान,मैदानी खेळ,बौद्धिक सत्र,नाटक,डोकमेंटरी,पथनाट्य, चळवळीची गाणी इ.विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या राष्ट्रीय युवा छावणी शिबिरामध्ये महर्षी कर्वे आदर्श महिला महाविद्यालय श्रीवर्धन च्या कु.सानियापुसाळकर,कु.दिपाली चोगले,कु.आर्या ठाणगे या विद्यार्थिनींनी हिरीरीने सहभाग घेतला.
महर्षी कर्वे आदर्श महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय पांडुरंग राणे यांनी राष्ट्रीय युवा छावणी शिबिराला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.आणि तेथील श्री.राजन इंदूलकर -माजी सरचिटणीस, श्रीमती.अश्विनी सातव -डोके-पत्रकार (छावणी प्रमुख),श्री.राजेश कुलकर्णी -सरचिटणीस,श्री.विनायक धुरी-कार्यालयीन प्रमुख ,श्री. राहूल आनपट-सब व्यवस्थापक , तेथील व्यवस्थापक श्री.चिंतामणी पवार यांचेशी संवाद साधला व समाधान व्यक्त केले.