परळी पासून अंबाजोगाईचा संपर्क तुटला, ऐतिहासिक रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांची तारांबळ.

✒श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी✒
बीड/परळी:- परळी ते अंबाजोगाईला जोडणाऱ्या ऐतिहासिक राज्य महामार्गाचे काम पुन्हा एकदा बंद पडले असून मोठ्या पावसामुळे कण्हेरवाडी येथील पर्यायी रस्ता अन पूल वाहून गेल्याने दोन्हीकडील संपर्क ठप्प झाला आहे .माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यकाळापासून सुरू असलेल्या या रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाही त्यामुळे प्रत्येक कामात श्रेय घेणारे नेते आता याची जबाबदारी घेणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे .
परळी अंबाजोगाई मार्गावरिल कन्हेरवाडी जवळील पुलाचे काम चालू असल्यामुळे वाहतुकीसाठी पुला लगतच तात्पुरत्या स्वरूपाचा मार्ग काढला होता परंतु दुपारी नंदागौळ परिसरात ढगफुटी सारखा जोराचा पाऊस झाल्याने हा फुल अक्षरशा सपाट झाला आहे यामुळे परळी अंबाजोगाई राज्य महामार्ग बंद झाला असून वाहतूक ठप्प झाली आहे
कालपासून मोसमी पावसाला सुरुवात झाली असून आज दुपारी नंदागौळ परिसरात ढगफुटी सारखा पाऊस झाला आहे या पावसाचे पाणी घाटातुन शेतकऱ्यांच्या शेतात शेतातून होऊन नदीला आल्याने हा पूल वाहून गेला आहे यामुळे या राज्य महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे वाहनाच्या जवळजवळ दोन किलोमीटर रांगा लागल्या असून प्रवाशांना प्रवासासाठी प्रचंड गैरसोय झाली आहे, दरम्यान नंदागौळ कनेरवाडी घाट परिसरात असलेल्या शेतीचेही फार मोठे नुकसान झाल्याची माहिती येत आहे ढगफुटी ची माहिती मिळताच महसूल अधिकारी ग्रामीण पोलीस घटनास्थळी पाहणी करत आहेत.